जगात सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट कुठले माहितीये?; तर मग वाचाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hollywood film avatar world highest grossing film avengers endgame Jurassic world titanic record

हॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्यातील अशाच काही चित्रपटांच्या कमाईचा आढावा घेणार आहोत.

जगात सर्वाधिक कमाई केलेले चित्रपट कुठले माहितीये?; तर मग वाचाच

मुंबई - आता जरी कोरोनामुळे मनोरंजन जगतावर आर्थिक मंदीचे सावट असले तरी यापूर्वी आपल्या कलाकृतीनं सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे काही चित्रपट रसिकांच्या मनात आहेत. आता आपण ज्या चित्रपटांच्या आर्थिक कमाईचा आढावा घेणार आहोत त्यात बहुतांशी चित्रपट हे हॉलीवूडचेच आहेत. त्यात बॉलीवूडच्या चित्रपटांचा समावेश नाही. मात्र याचा अर्थ असा नाही की बॉलीवूडच्या चित्रपटांना तिथे वाली नाही. दंगल, बाहुबली, त्याचा दुसरा भाग, थ्री एडियट्स सारखे चित्रपटांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. हॉलीवूडच्या काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली आहे. त्यातील अशाच काही चित्रपटांचा आढावा आपण आता घेणार आहोत.

अवतार हा हॉलीवूडचा प्रसिध्द चित्रपट. त्याला जगभरात मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. एवढचं नव्हे तर त्याला चीनमध्ये दोनवेळा रिलीज करण्यात आले होते. तुम्हाला आतापर्यत अवतार सिनेमानं केलेल्या बिझनेसचा आकडा सांगितल्यास धक्का बसेल. या चित्रपटानं 20 हजार 368 कोटी म्हणजे चक्क 2.802 बिलियन डॉलर एवढी प्रचंड कमाई केली आहे. एवढी कमाई करणारा तो जगातील एकमेव चित्रपट आहे. अशाप्रकारे अवतारनं 20 हजार 332 कोटी म्हणजे 2.797 बिलियन डॉलर कमाई करणा-या अवेंजर्स एंडगेमला मागे सोडले आहे. याशिवाय आणखी असे काही चित्रपट आहेत ज्यांनी ब़ॉक्स ऑफिस दणाणून सोडले होते.

2015 मध्ये दिग्दर्शक जॉस व्हेडन यांनी द अवेंजर्स मधून 9799.14 कोटी रुपयांचा बिझनेस केला होता. त्यावेळी ती सर्वाधिक कमाई करणारी सहावी फिल्म होती. या चित्रपटाला भारतातुनही चांगला प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय 2015 मध्ये आलेल्या ज्युरासिक वर्ल्डनं 10837.46 कोटी रुपयांची कमाई केली होती.  त्याचे दिग्दर्शक कोलिन ट्रवोरो होते. भारतातही या चित्रपटानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. डायनासोर्स नावाच्या प्राण्यानं केलेला विध्वंस या चित्रपटातून साकारण्यात आला होता. 
स्टारवॉर्स - द फोर्स अवेकेंस हा 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याचे दिग्दर्शक जेजे अबराम्स होते. त्याने बॉ़क्स ऑफिसवर 13368.37 कोटी रुपये कमावले होते.

 सायन्स फिक्शन प्रकारातील हा चित्रपट होता. या चित्रपटानं पूर्ण जगभरात 13 हजार 336 कोटी रुपयांचा व्यापार केला होता. यासगळ्यात टायटॅनिकला विसरुन कसे चालेल, 1997 मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित होता. त्याचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन होते. टायटॅनिक नावाचे एक महाकाय जहाज एका हिमनगाला धडकून समुद्राच्या तळाला जाते. त्यात असणारे प्रवासी कशाप्रकारे आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात हे त्यात दाखविण्यात आले होते. अवेंजर्सच्या अगोदर टायटॅनिक हा जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट होता.

दोन वर्षांपूर्वी अवेंजर्स एंडगेम प्रदर्शित झाला होता. त्यानं जगभरात 20 हजार 332 कोटी रुपये कमावले होते. त्यानंतर त्याचा मोठा बोलबाला झाला होता. आता हा रेकॉर्ड अवतारनं तोडला आहे. आणि अवेंजर्स हा सर्वाधिक कमाईच्या बाबतीत दुस-या क्रमांकावर आला आहे. त्या चित्रपटाचं दिग्दर्शन जोई रुसो आणि एंथोनी रुसो यांनी केलं होतं.
 
 

 
 

टॅग्स :China