रिहानाची शंभर कोटींची हवेली पाहिलीये? ; नाद नाय..

 rihana new house story
rihana new house story

मुंबई - रिहाना भारतीय प्रेक्षकांना माहिती नव्हती अशातला भाग नाही. मात्र दिल्लीत जे शेतकरी आंदोलन झाले त्यामुळे तिचं महत्व आणखी अधोरेखित झाले होते. त्या आंदोलनाला या पॉप सिंगरनं पाठींबा दिला होता. तसेच काही प्रक्षोभक वक्तव्येही केली होती. त्यामुळे रिहानची सगळ्या माध्यमांनी दखल घेतली होती. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावरही तिच्या नावाची चर्चा सुरु झाली. अनेकांनी तिच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र त्याचा कुठलाही परिणाम रिहानावर झाला नाही. आपण जे काही बोललो त्यावर ठाम असल्याचे म्हणणे होते. तसेच एका ज्वेलर्स कंपनीची जाहिरात करताना तिनं अशाप्रकारची वेशभुषा केली होती की त्यामुळे हिंदूच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या.

रिहाना प्रचंड श्रीमंत सेलिब्रेटी आहे. तिची श्रीमंती किती आहे याची चर्चा सोशल मीडियावर नेहमी होत असते. बारबेडियन गायिका आणि मॉडेल असणा-या रिहाना आता कुठल्या राजकीय मुद्द्यांमुळे नव्हे तर तिच्या श्रीमंतीमुळे चर्चेत आली आहे. त्याचे कारण तिचा महागडा अलिशान महाल आहे. तिच्या संपत्तीचा विषय हा अनेकांसाठी खास चर्चेचा विषय आहे. यामुळे ती नेहमी लाईमलाईटमध्ये असल्याचे पाहवयास मिळाले आहे. आता रिहाना सोशल मीडियावर सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरत आहे याचे आणखी एक कारण म्हणजे तिची 100 कोटींची अलिशान हवेली.

त्या हवेलीचे फोटो सोशल मीडिय़ावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्याला नेटक-यांची पसंतीही मिळत आहे. रिहानाची एकुण संपत्ती ही 13.8 मिलियन डॉलर्स एवढी आहे. रिहानाच्या हवेलीचे फोटो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे तिच्यावर कौतूकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तिचा हा महाल अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील बेवेर्ली शहरात आहे. ज्याठिकाणी हॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींची घरे आहेत. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही हवेली 1930 मध्ये तयार करण्यात आली आहे. त्याचे क्षेत्रफळ हे 21 हजार 958 स्क्वेअर फुट एवढे आहे. 

ती हवेली सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याचा रंग. फर्निचर. बांधकाम हे सारे विलोभनीय आहे. एवढ्या मोठ्या हवेलीत केवळ पाचच खोल्या आहेत. तर वॉशरुमची संख्या सात एवढी आहे. त्याची चमकही काही वेगळीच आहे. त्या हवेलीचा लुकही मोठा अँटिक पध्दतीचा आहे. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com