चांगलं दिसण्यासाठी वेशभुषा करा, भिकारी दिसण्यासाठी नव्हे; कंगणा बरळली

actress Kangana ranaut tweet on ripped jeans look stylish not homeless beggar
actress Kangana ranaut tweet on ripped jeans look stylish not homeless beggar

मुंबई - कंगणा गप्प बसेल तो दिवस मोठा म्हणावा लागेल. ती सतत काही ना काही बडबड करत असते. अशावेळी आपण कुणाबद्दल बोलत आहोत, कशाप्रकारचे वक्तव्य करत आहोत याच्याशी तिला काहीही घेणे - देणे नसते. ती आपल्याच नादात बेताल वक्तव्य करुन सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. आताही तिनं आपले काही फाटलेल्या जीन्समधले फोटो शेअर केले आहेत. त्यात ती स्टायलिस्ट दिसत आहे असे तिचे म्हणणे आहे. मात्र आपले  दिसणे आणि इतरांचे दिसणे यात कमालीचा फरक आहे. अशावेळी तिनं ज्यांनी अशाप्रकारची वेशभुषा केली होती. त्यांच्यावर टीका केली आहे. तिचं हे व्टिट सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

रिप्ड जीन्स प्रकरणावरुन कंगणाची प्रतिक्रिया भलतीच वादाची झाली आहे. तिनं नवोदितांना काही सल्ला दिला आहे. तो देताना कंगणानं आपले जीन्समधील काही फोटोही शेअर केले आहेत. त्यात ती स्टायलिस्ट दिसत आहे. अशावेळी आपण केलेली स्टाईल सर्वांना कशाप्रकारे भावली हे सांगण्यास कंगणा विसरलेली नाही. दुसरीकडे इतरजण स्टाईलच्या नावानं जे काही करतात ते एखाद्या भिका-यासारखे वाटत असल्याची टीकाही कंगणानं यावेळी केली आहे. त्यामुळे तिची प्रतिक्रिया वाद ओढावून घेताना दिसत आहे.

कंगणानं जीन्समधील आपले काही फोटो शेअर केले आहेत. त्यात ती जीन्स घातलेली दिसते आहे. त्यावेळी तिनं नवोदितांना सांगितले की, ज्यावेळी तुम्ही एखादी फाटलेली जीन्स घालता तेव्हा तुम्ही आकर्षक दिसणं गरजेचं आहे. कंगणाच्या त्या व्टिटनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी तिच्या या व्टिटवरुन तिला प्रतिक्रियाही दिल्या आहेत. आपल्या बेधडक प्रकारच्या स्वभावामुळे कंगणानं अनेकांशी पंगा घेतला आहे. त्यामुळे बॉलीवूडमध्ये तिचे मित्र कमी आणि विरोधकच जास्त असल्याचे काहीवेळा दिसून आले आहे.

कंगणानं सोशल मीडियावर जीन्सच्या वेषातील आपले फोटो शेअर केले आहेत. ती म्हणाली, जर का तुम्हाला रिप्ड जीन्स घालायची आहे त्यावेळी प्रयत्न करा की, तुम्ही कुल दिसाल. जसे की आता माझ्या फोटोंमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही इतकेही गरीब वाटता कामा नये की जसे तुम्हाला तुमचे आई-वडिल महिना भराचा भत्ता देत नाही आणि तुम्ही असे भिका-यासारखे राहता आहात. हल्ली बहुसंख्य युवक तर अशाप्रकारे राहून भिका-यासारखी वेशभुषआ करताना दिसून येत असल्याची टिप्पणी कंगणानं केली. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com