Honey Singh Gets Threat: सलमान खान पाठोपाठ हनी सिंगला देखील जिवे मारण्याची धमकी!

Yo Yo Honey Singh Gets Threat:
Yo Yo Honey Singh Gets Threat:SAKAL

Yo Yo Honey Singh Gets Threat: प्रसिद्ध रॅपर आणि गायक हनी सिंगला कॅनडात असलेल्या गँगस्टर गोल्डी ब्रार या गँगस्टरने जीवे मारण्याची धमकी दिली आहे.  हनी सिंगच्या कार्यालयाच्या वतीने दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल कडे तक्रार देण्यात आली आहे. त्याला ही धमकी व्हाईस नोटच्या माध्यामातुन देण्यात आली आहे.

Yo Yo Honey Singh Gets Threat:
Tere Ishq Mein: रांझणाला दहावर्ष पुर्ण! आता निर्माते धनुषसोबत आणताय 'तेरे इश्क में'

सध्या व्हॉईस नोटचा तपास स्पेशल सेल करत आहे. हनी सिंगच्या ऑफिसच्या वतीने स्पेशल सेलकडून माहिती शेअर करण्यात आली आहे.

धमकीची व्हॉईस नोट मिळाल्यानंतर हनी सिंगने दिल्ली पोलीस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली. त्याचबरोबर स्पेशल सेलचे स्पेशल सीपी एचजीएस धालीवाल यांचीही भेट घेतली

मिडिया रिपोर्टनुसार, हनी सिंगने कॅनडामध्ये बसलेल्या गोल्डी ब्रार यानेच हा व्हॉईस नोट पाठवत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केला आहे. त्याने ती व्हॉईस नोटही पोलिसांना दिली आहे. आता या प्रकरणाचा अधिक तपास दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडे सोपवण्यात आला आहे.

Yo Yo Honey Singh Gets Threat:
Prakash Kaur : 'कुठल्याही पुरुषानं माझ्याऐवजी....' धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नीची काय होती प्रतिक्रिया?

सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणातही गोल्डी ब्रार या गँगस्टर आहे. रिपोर्ट्सनुसार, गोल्डीचे पूर्ण नाव सतविंदरजीत सिंग आहे. तो सध्या कॅनडामध्ये राहतो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी व अनेक फौजदारी खटले प्रलंबित आहेत. त्यातच काही काळापुर्वी सलामान खानला देखील धमकीचे फोन आणि ईमेल आले होते यातही ब्रारचे नाव पुढे आले होते.

Yo Yo Honey Singh Gets Threat:
Bigg Boss OTT 2: जियाच्या एक्स बॉयफ्रेंडवरुन तिच्यात अन् पलकमध्ये चांगलच वाजलं...

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगची कोणतीही वेगळी ओळख सांगायची गरज नाही. हनी सिंग सध्या त्याच्या लेटेस्ट म्युझिक अल्बम हनी सिंग ३.० मुळे चर्चेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com