'हाउसफुल 4' चा ट्रेलर प्रदर्शित; कॉमेडीची मेजवानी आणि हॉररचा तडका

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 सप्टेंबर 2019

अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित चित्रपट 'हाउसफुल 4' चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांचा 'हाउसफुल 4' हा चित्रपट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रप़टाचे गंमतीशीर पोस्टर प्रदर्शित झाले. ज्यामध्ये चित्रपटातील कलाकार एका वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत.

विशेष म्हणजे या सिनेमाचा ट्रेलर फक्त भारतात नव्हे तर य़ुनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया आणि दुबई या देशांमध्येही करण्यात आला आहे. ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येते की, सिनेमा भरपूर कॉमेडी, हॉरर आणि फुल ड्रामा असा असणार आहे. या सिनेमाची चर्चा बरेच दिवस चालू असतानाच त्याचे पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांमध्य़े चित्रपटासाठी उत्सुकता वाढली. काही वेळापूर्वी प्रदर्शित झालेल्या ट्रेलरला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या चित्रपटाची दमदार कास्ट हे सुद्धा या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. दोन पिढ्यांवर चित्रपटाची कथा दोन पिढ्यांवर आधारीत आहे. ज्यामध्ये एकीकडे 1419 चा काळ दाखविण्यात आलाय तर दुसरीकडे 2019 ची पिढी दाखविली आहे. चित्रपटातील कालाकारांचा 600 वर्षाआधीचा पूर्नजन्म दाखविला आहे. 

अक्षय कुमारसह क्रिती सॅनन, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा दगुब्बती, कृती खारबंदा, पूजा हेगडे, अमंदा रुसारिओ, चंकी पांडे, नवाझुद्दिन सिद्धिकी अशी दमदार कास्ट असणार आहे. हाउसफुल 4 हा एक मल्टी पिरीएड ड्रामा आहे. येत्या दिवाळीत म्हणजेच 36 ऑक्टोबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Houseful 4 trailer out movie full of horror and comedy