'हाऊसफुल 4' चे पोस्टर रिलिज, सर्व कलाकार दिसले गंमतीशीर अवतारात !

वृत्तसंस्था
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित आगामी चित्रपट 'हाऊसफुल 4' चे पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आले आहेत.

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमारचा बहुप्रक्षेपित आगामी चित्रपट 'हाऊसफुल 4' चे पोस्टर अखेर प्रदर्शित करण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये अक्षय कुमारसह इतर कलाकारही मजेशीर अंदाजात दिसत आहेत. इन्स्टाग्रामवर अक्षयने त्याच्या लुकचे पोस्टर शेअर केले. त्यामध्ये तो बाण खेचताना दिसतोय आणि 'बाला शैतान का साला' असं त्या पोस्टरवर लिहिलं आहे. पोस्टर शेअर केल्यानंतर काही वेळातच हे पोस्टर व्हायरल झाले असून प्रेक्षकांनी त्याला पसंती दिली आहे. 

पोस्टर रिलिज झाल्यानंतर चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळतेय. फॉक्स स्टार इंडियाने चित्रपटामधील सर्व कलाकरांचे पोस्टर इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,' बालाने 1419 मध्ये गोष्ट सुरु केली होती मात्र हॅरी संपवेल ती 2019 मध्ये! वेडेपणासाठी तयार रहा. आम्ही ट्रेलर घेऊन येत आहोत 27 सप्टेंबरला'

या चित्रपटामध्ये अक्षय कुमारसह क्रिती सॅनन, रितेश देशमुख, बॉबी देओल, राणा दग्गुबती, कृती खारबंदा, पूजा हेगडे, अमंदा रुसारिओ, चंकी पांडे, नवाझुद्दीन सिद्दिकी अशी दमदार कास्ट असणार आहे.

चित्रपटाचं निर्मितीकरण साजिद नाडियादवालाने केलं आहे. याआधी हाऊसफुलचं दिग्दर्शन साजिद खान करत होता. मात्र त्याच्यावर 'मी टू' चे गंभीर आरोप लागल्याने  चित्रपट सोडावा लागला. त्यानंतर दिग्दर्शनाची सुत्रं फरहाद सामजीने हाती घेतली. चित्रपट येत्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Housefull 4 First Look out all the characters look insane