Dilip Joshi: अभिनय क्षेत्र सोडून निघालेल्या दिलीप जोशी यांना कशी मिळाली 'जेठालाल' ही भूमिका,बघाच.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

how dilip joshi got jethalaal role in taarak mehta ka ooltah chashmah after many rejection

Dilip Joshi: अभिनय क्षेत्र सोडून निघालेल्या दिलीप जोशी यांना कशी मिळाली 'जेठालाल' ही भूमिका,बघाच..

Dilip Joshi: गेली १४ वर्षे निखळ मनोरंजन करणारी आणि घराघरात पोहोचलेली मालिका म्हणजेच 'तारक मेहता उलटा चश्मा'. या मालिकेतील प्रत्येक कलाकार आपल्याला आपल्या घरातला वाटू लागला आहे. त्यापैकीच एक म्हणजे 'जेठालाल'.

हे पात्र साकारणारे अभिनेते दिलीप जोशी यांनी हिंदी आणि गुजराती भाषेत अनेक भूमिका केल्या आहेत. ते स्वतः एक रंगकर्मी असून गुजराती रंगभूमीवर त्यांचे भरीव योगदान आहे. पण तारक मेहता मालिकेतून ते घराघरात पोहोचले.

तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अभिनय क्षेत्रात काम मिळत नाही म्हणून ते या क्षेत्रालाच रामराम करणार होते. पण जेठालालची भूमिका त्यांच्या आयुष्यात आली आणि सगळेच बदलून गेले. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाविषयी..

(how dilip joshi got jethalaal role in taarak mehta ka ooltah chashmah after many rejection)

दिलीप जोशी वयाच्या 12 व्या वर्षापासून अभिनय करत आहेत. अनेक वर्षांपासून तो चित्रपट आणि टीव्ही शोच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. गेली 34 वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत असून सलमान खान, अक्षय कुमार अनेक दिग्गजांसोबत त्यांनी चित्रपट केले आहेत.

'मैने प्यार किया' हा त्यांचा पहिला चित्रपट होता. 'हम आपके है कौन में' त्यांनी माधुरी दीक्षित म्हणजेच निशाचा दूरचा भाऊ भोला प्रसादची भूमिका साकारली होती. 'मैने प्यार किया'मध्ये त्याने रामूची भूमिका साकारली होती, तर 2000 साली आलेल्या 'खिलाडी 420'मध्येही छोटीशी भूमिका साकारली होती.

परंतु त्यानंतर बरीच वर्षे त्यांना काम मिळत नव्हते. म्हणून त्यांनी मनोरंजन क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला आणि अशातच 2008 मध्ये त्यांच्या आयुष्यात जेठालाल हे पात्र आले. या भूमिकेने त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले असले तरी ही भूमिकाही त्यांना मोठ्या कष्टाने मिळाली होती.

जेठालाल या भूमिकेसाठी आधी राजपाल यादव, अली असगर, योगेश त्रिपाठी आणि एहसान कुरेशी अशा अनेक कलाकारांना ही भूमिका ऑफर करण्यात आली होती. पण ही भूमिका करण्यास सर्वांनी नकार दिला. त्यानंतर दिलीप जोशी यांणा विचारण्यात आले. दिलीप यांनी जेठालाल या भूमिकेसाठी होकार दिला आणि आज त्यांची ओळखच 'जेठालाल' या नावाने झाले आहे.