'प्रदर्शनापूर्वीच चित्रपट लिक' होतो, नेमकं काय होतं ?

क्रिती सेनन (kriti sanon) आणि पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) यांचा मिमी (mimi) हा चित्रपट 30 जुलैला प्रदर्शित होणार होता.
movie hacked
movie hacked Team esakal

मुंबई - क्रिती सेनन (kriti sanon) आणि पंकज त्रिपाठी (pankaj tripathi) यांचा मिमी (mimi) हा चित्रपट 30 जुलैला प्रदर्शित होणार होता. मात्र तो चार दिवस अगोदरच प्रदर्शित झाला. हीच बाब राधे या चित्रपटाच्या बाबत सांगता येईल. यासगळ्या प्रकारामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांना मोठा धक्का बसला होता. ऑनलाईन लिंक व्हायरल झाल्यानं अनेकांनी तो कालच डाऊनलोड करुन पाहिला. अशानं निर्मात्यांना मोठ्या तोट्याला सामोरं जावं लागतयं. राधेचीही लिंक प्रदर्शनाच्या एक दिवस अगोदर व्हायरल झाली होती. (how movies get leaked before their release date mimi to radhe yst88)

वेळेच्या अगोदरच एखाद्या चित्रपटाची लिंक ऑनलाईन व्हायरल होण म्हणजे काय हे आपण यानिमित्तानं जाणून घेणार आहोत. बाहुबलीला देखील अशाप्रकारच्या पायरसीला सामोरं जावं लागलं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून पायरसी निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यासाठी डोकेदुखीचा भाग ठरत आहे. तंत्रज्ञांकडून सर्व खबरदारी घेऊनही चित्रपट व्हायरल कसा होतो, हे आता आपण जाणून घेणार आहोत.

कुठलाही चित्रपट असो तो प्रदर्शित करण्यासाठी निर्माते प्रयत्नशील असतात. मात्र दरवेळी तो ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होतो असे होत नाही. अनेकदा त्यांना पायरसीला सामोरं जावं लागतं. टोरंट आणि टेलिग्रामवर संबंधित चित्रपटाची लिंक व्हायरल होते. सध्याच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा मुद्दा वादाचा आहे. चित्रपट पाहण्याअगोदरच प्रेक्षकांना पाहायला मिळणं यामुळे निर्मात्यांना कोटयवधीचा तोटा होतो.

केवळ एकाच मार्गानं संबंधित चित्रपटाच्या लिंक या प्रेक्षकांच्या मोबाईलवर जात नाहीत. एखाद्या चित्रपटाच्या ग्रुपमध्ये शेकडो कर्मचारी काम करत असतात. त्यांना आपण कास्ट किंवा क्रु मेंबर्स असे म्हणतो. याशिवाय काही व्हेंडर्सही असतात. जे कोणी फायनल एडिटिंग बरोबरच प्रिमियमपर्यत त्या चित्रपटाच्या प्रक्रियेसोबत असतो त्याच्याकडून अनेकदा ती लिंक व्हायरल होण्याचा धोका अधिक असतो. तर कित्येकजण काही हजारासाठी देखील लिंक व्हायरल करत असल्याचे समोर आले आहे.

movie hacked
'ते चिअर अप नव्हे टर उडवत होते',साराचा व्हिडिओ व्हायरल
movie hacked
मला त्याच्याशी लग्न करायचं नव्हतं, शिल्पाचा खुलासा

त्यामुळेच की काय आता निर्माता आणि दिग्दर्शक हे सेटवर आपल्या क्रु मेंबर्सला मोबाईल फोन अलाउड करत नाही. मात्र एवढी काळजी घेऊन सुद्धा अनेकदा सेटवरील फोटोग्राफ व्हायरल झाल्याची उदाहरणं आहेत. चित्रपट व्हायरल होण्याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे हॅकिंग. इंटरनेटच्या विश्वातील सर्वात मोठा धोका असे आपण त्याला म्हणु शकतो. ज्यावेळी चित्रपटाच्या एडिटींगचे काम सुरु असते तेव्हा डबिंगच्या पूर्ण प्रोसेसपर्यत तो चित्रपट प्रॉडक्शन कंपनीच्या सर्वरवर असतो. त्यातून अनेकदा हॅकिंगचे प्रकार समोर आले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com