'बिग बॉस १४' साठी सलमान खान घेणार एका एपिसोडचे एवढे कोटी रुपये?

salman bigg boss fees
salman bigg boss fees

मुंबई- 'बिग बॉस' हा शो जगभरात प्रसिद्ध आहे. या रिऍलिटी शोसाठी चाहते वेडे आहेत. दरवेळी प्रेक्षक 'बिग बॉस'च्या नव्या सिझनची आतुरतेने वाट पाहत असतात. हिंदी 'बिग बॉस'ची उत्सुकता असण्याचं एक खास कारण आहे ते म्हणजे अभिनेता सलमान खान. सलमान खानची हा शो होस्ट करण्याची पद्धत अनेकांना आवडते. त्याची स्टाईल, गेम्स, खोडकरपणा यासाठी चाहते आवर्जुन 'बिग बॉस' पाहतात. या शोमध्ये येण्यासाठी जशी स्पर्धकांना जास्त रक्कम मिळते त्यापेक्षाही तगडी रक्कम होस्ट सलमान खानला दिली जाते. यंदा 'बिग बॉस १४' साठी सलमान खान अशीच तगडी रक्कम आकारतोय अशी चर्चा आहे. 

सलमान खान पुन्हा एकदा 'बिग बॉसचा १४' वा सिझन होस्ट करणार आहे. गेल्या १० वर्षांपासून सलमान हा शो होस्ट करतोय. त्यामुळे आता हा सलमानचा ११ वा सिझन असणार आहे. या शोच्या जबरदस्त टीआरपीमागे सलमान खानचा मोठा हात आहे. त्यामुळे साहजिकंच हा नवा सिझन होस्ट करण्यासाठी सलमान जास्त पैश्यांची मागणी करु शकतो. सलमानने अनेकदा शोमध्ये म्हटलं आहे की त्याला 'बिग बॉस' होस्ट करण्याची इच्छा नाहीये. मात्र निर्मात्यांच्या विनंतीमुळे तो हा शोसोबत जोडला गेला आहे. त्यामुळे सलमान जर शो साठी हवा असेल तर त्याला हवी ती रक्कम देण्यासाठी निर्माते प्रयत्न करत असतात. 

सलमानच्या मानधनावरुन नेहमीच अनेक चर्चा होत असतात. मात्र अधिकृतरित्या ते कधीच सोमर आलं नाही की तो किती रक्कम घेतो. आता जसजसा १४ वा सिझन जवळ येत आहे तसं सलमानच्या फीवरुन प्रकरण जरा तापलेलं आहे. रिपोर्टनुसार 'बिग बॉस १४' च्या एका एपिसोडसाठी सलमानने चक्क १६ कोटी रुपयांची मागणी केली आहे.

आता हा दावा कितपत खरा ते माहित नाही मात्र १० वर्षांनंतर यंदा ११ व्या वर्षी सिझन होस्ट करण्यासाठी सलमानला नक्कीच तगडी रक्कम मिळू  शकते. कारण देशातील एवढा लोकप्रिय शो होस्ट करणं सोपं नाहीये. अनेकदा सलमानला त्याच्या मतांवरुन पक्षपात करत असल्याचं म्हटलं गेलंय इतकंच नाही तर आवडत्या स्पर्धकाला पाठिशी घालण्यावरुन त्याला अनेकदा ट्रोलिंगचा सामन देखील करावा लागला आहे.   

how much salman khan charged fees for hosting one episode of bigg boss 2020 reports  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com