SC च्या निर्णयाआधी सुशांतची बहिण श्वेताने व्हिडिओ शेअर करत केली सीबीआयची मागणी

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 13 August 2020

सुशांतची बहिण श्वेताने भावाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पहिल्यांदाच सुशांतच्या बहिणीने व्हिडिओ शेअर करुन ही मागणी केली आहे. 

मुंबई- सुप्रीम कोर्ट आज अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या दोन याचिकांवर निर्णय देणार आहे. ज्यामध्ये तिने अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्युचा तपास पटनातून मुंबईकडे ट्रांसफर करण्याची मागणी केली आहे. तिने तिच्या याचिकेमध्ये सध्या सीबीआय तपास करण्यालाही नकार दिला आहे. यादरम्यान सुशांतची बहिण श्वेताने भावाला न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. पहिल्यांदाच सुशांतच्या बहिणीने व्हिडिओ शेअर करुन ही मागणी केली आहे. 

हे ही वाचा:  उपचारांसाठी अमेरिकेला जाण्यात संजय दत्तला येऊ शकतात अडचणी, मुंबई स्फोटांशी संबंधित आहे प्रकरण  

सुशांत सिंह राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती सतत सोशल मिडियावर तिच्या भावासाठी न्यायाची मागणी करत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या आधी तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये श्वेता सिंह किर्ती भाऊ सुशांतच्या मृत्युच्या तपासणीसाठी सीबीआयची मागणी करत आहे.श्वेता या व्हिडिओमधून सुशांतच्या चाहत्यांना सांगतेय, माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे आपण सगळ्यांनी एकत्र येऊन सीबीआय तपासाची मागणी केली पाहिजे. जेणेकरुन सत्य समोर येईल.

या व्हिडिओ सोबतंच श्वेताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे आपण सगळ्यांनी सीबीआय तपासाची मागणी करायला हवी.  निष्पक्ष तपासाची मागणी करणं हा आमचा अधिकार आहे आणि आम्ही आशा करतो की सत्य समोर येईल. या पोस्टमध्ये श्वेताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान ऑफीस यांना टॅग केलं आहे. सोशल मिडियावर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. 

आता सुप्रीम कोर्ट हा निर्णय घेणार आहे की रिया चक्रवर्ती विरुद्ध या प्रकरणाचा तपास कोण करेल? सगळे पक्ष आज कोर्टात त्यांची बाजू लिखित स्वरुपात दाखल करणार आहेत.मंगळवारी सगळ्या विरोधी पक्षांमध्ये वाद झाले होते म्हणून सुप्रीम कोर्टाने गुरुवार पर्यंतचा वेळ दिला होता. आता सुप्रीम कोर्ट कोणत्याही क्षणी आपला निर्णय देऊ शकतं.  

shweta singh kirti shared a video and requesting for a cbi probe into the late actor death  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shweta singh kirti shared a video and requesting for a cbi probe into the late actor death