Vikram Vedha: विक्रम-वेधा नाराज, एकत्र प्रमोशन टाळतायत...प्रदर्शनाआधीच वादाची चर्चा Hrithik Roshan, Saif Ali Khan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik and Saif  are not promoting 'Vikram Vedha' together,why?

Vikram Vedha: विक्रम-वेधा नाराज, एकत्र प्रमोशन टाळतायत...प्रदर्शनाआधीच वादाची चर्चा

Vikram Vedha: बहुचर्चित विक्रेम वेधा येत्या ३० सप्टेंबर रोजी रीलिज होत आहे. या सिनेमाच्या माध्यमातून हृतिक रोशन आणि सैफ अली खान पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत,पण असं असलं तरी हो दोघे एकत्र सिनेमाचं प्रमोशन करताना दिसत नाहीत.त्यामुळे सगळीकडेच दोघांत काही बिनसलंय का अशी चर्चा सुरू होती. चला जाणून घेऊया दोघं एकत्र सिनेमाचं शूट का करत नाहीयेत ते.(Hrithik and Saif are not promoting 'Vikram Vedha' together,why?)

हेही वाचा: घट्ट पॅंट घातली म्हणून इराणमध्ये अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते पाहून..

विक्रम वेधाच्या प्रमोशनल कार्यक्रमात जर हृतिक उपस्थित असेल तर तिथे सैफ नसतो आणि जेव्हा सैफ उपस्थित असतो तेव्हा हृतिक तिथे हजर नसतो. असा प्रश्न सर्वसामान्य चाहत्यांना पडला होता. दोघांमध्ये सगळं ओके आहे ना अशा शंकेची पालही चुकचुकली. पण आता यामागचं कारण समोर आलं आहे. एका न्यूज पोर्टलला मिळालेल्या माहितीनुसार,सैफ आणि हृतिकमध्ये काहीच बिनसलं नसून, सिनेमाच्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीचं ते दोघे पालन करत आहेत म्हणूनच प्रमोशनला एकत्र दिसत नाहीत असं कळालं आहे.

हेही वाचा: 'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

हृतिक आणि सैफ सिनेमात एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत,त्यामुळे मेकर्सला ऑफस्क्रीनही ते कायम ठेवायचं होतं. म्हणजे त्यांच्यात सलोख्याचं असलेलं ऑफस्क्रीन नातं लोकांसमोर आणून सिनेमातील त्यांच्या टशनला धक्का पोहोचवायचा नव्हता हाच मूळ हेतू आहे. आणि हेच कारण आहे की दोघं प्रमोशनला एकत्र फिरत नाहीयत.

हेही वाचा: Boycott Vikram Vedha: 'मुलाचं नाव राम तर नाही ठेवणार...', सैफच्या व्हिडीओनं खळबळ

विक्रम वेधा सिनेमात हृतिक रोशननं गॅंगस्टर साकारलाय तर सैफनं पोलिस ऑफिसर. सिनेमाच्या ट्रेलरला आणि गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला दिसला आहे,आता याचं परिवर्तन थिएटरमधील गर्दीत होऊ दे म्हणजे मिळवलं.

हा सिनेमा तामिळमधील विक्रम वेधा सिनेमाचा ऑफिशिअल रीमेक आहे. तामिळ सिनेमात आर माधवन आणि विजय सेथुपत्ती यांच्या मुख्य भूमिका होत्या. आणि सिनेमानं चांगला बिझनेस करत हिट सिनेमांमध्ये आपलं नावही नोंदवलं होतं. हृतिक-सैफचा 'विक्रम वेधा' ३० सप्टेंबर,२०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.

हेही वाचा: गोल्डर्न गर्ल बनलेल्या रश्मिकानं दिल्या किलर पोझ..

हा सिनेमा तामिळमधील विक्रम वेधा सिनेमाचा ऑफिशिअल रीमेक आहे. तामिळ सिनेमात आर माधवन आणि विजय सेथुपत्ती यांच्या मुख्य भूमिका होत्या. आणि सिनेमानं चांगला बिझनेस करत हिट सिनेमांमध्ये आपलं नावही नोंदवलं होतं. हृतिक-सैफचा विक्रम वेधा ३० सप्टेंबर,२०२२ रोजी थिएटरमध्ये रिलीज होत आहे.