
ह्रतिक-सबाच्या नात्यावर शिक्कामोर्तब.. पहिली पत्नी सुझैनही फिरतेय याच्यासोबत...
bollywood news : बाॅलिवूड अभिनेता हृतिक रोशनचे (hrithik roshan) वैयक्तिक आयुष्य सध्या बरेच चर्चेत आहे. सुझैन सोबत तो विभक्त झाल्यावरही असेच चर्चांना उधाण आले होते. आता त्याच्या नव्या जोडीदाराबद्दल बोलले जात आहे. मध्यंतरी तो अभिनेत्री सबा आझाद सोबत दिसला आणि त्यांच्या नात्याविषयी बोलले जाऊ लागले. सध्या ह्रतिक आणि सुझैन दोघेही आपापल्या नव्या जोडीदारासोबत असून यावर पूजा बेदीने खुलासा केला आहे.
हेही वाचा: काश्मिर फाईल्सवर गडकरी म्हणाले.. कट्टरतावादाने लोकशाही...
ह्रतिक आणि सबा यांनी याबाबत अद्याप स्पष्टता दिली नसली तरी ते काही दिवसांपूर्वीच ते हातात हात घालून फिरताना दिसले. याबाबत, पूजा बेदीने मात्र ह्रुतिक सबाला डेट करत असल्याची पुष्टी दिली आहे. नुकतेच गोव्यामध्ये एका पार्टीमध्ये ह्रतिक (hrithik roshan), सबा आझाद, ह्रतिकची पहिली पत्नी सुझैन खान (sussanne khan) आणि तिचा नवा जोडीदार अर्सलान गोनी एकत्र दिसले. या पार्टीत चौघांनाही एकत्र येऊन आनंद घेतल्याची माहीती समोर आली आहे.
हेही वाचा: 'शेर शिवराज'च्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी, दिग्पालने दिली ऑफर..
ह्रतिक आणि सुझैन आता आपापल्या नव्या जोडीदाराबरोबर आनंदी असल्याचे पूजा बेदीने माध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले आहे. 'हृतिक आणि सुझैन या दोघांना त्यांचे प्रेम पुन्हा नव्याने मिळाले याचा मला आनंद झाला आहे. जेव्हा लोकांना त्यांचं प्रेम मिळतं तेंव्हा मला आनंद होतो. सर्वच नाती कायम टिकत नसतात. जेव्हा एखाद्या नात्यात अडचणी येत असतील तेव्हा त्यातून बाहेर पडून याेग्य व्यक्तीचा शोध घेतला पाहिजे. त्यातून आपल्याला आपल्या स्वतंत्रतेचा आनंद घेता येतो. नात्यातील व्यक्ती चांगली असून चालत नाही. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर अर्थपूर्ण आणि उद्दीष्टपूर्ण नाती जोडली पाहिजेत,' अशी प्रतिक्रीया पूजा बेदीने (pooja bedi) दिली.
ती पुढे म्हणाली, 'हृतिक आणि सुझैन विभक्त होऊनही त्यांच्यामध्ये इतका आदर आणि एकमेकांना पाठिंबा देण्याची तयारी असल्याने त्यांची मैत्री पाहून आनंद होतो. त्यांना त्यांचे नवे प्रेम मिळाले आहे याचाही आनंद आहे,' त्यामुळे आता ह्रतिक आणि सुझैन आपल्या नव्या जोडीदारासोबत आनंदी असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Web Title: Hrithik Roshan And Saba Azad In
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..