
काश्मिर फाईल्सवर गडकरी म्हणाले.. कट्टरतावादाने लोकशाही...
NITIN GADKARI : काश्मिरी पंडितांवर झालेला अन्याय लोकांसमोर आणणाऱ्या THE KASHMIR FILES 'द काश्मीर फाईल्स' या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकल्याने जवळपास २५० कोटींहून अधिक कमाई या चित्रपटाने केली. जितके यश या चित्रपटाला मिळाले तितकेच वादही निर्माण झाले. हा चित्रपट रिलीज होण्याआधीच या वादाला सुरुवात झाली. चित्रपट प्रदर्शित होऊन वीस दिवस उलटले तरी अद्याप यावरील वाद थांबलेला नाही. एका विशिष्ट विचारधारेने हा मुस्मिल द्वेषी चित्रपट असल्याचा आरोप केला तर दुसऱ्या विचारधारेने आजवर लपवले गेलेले सत्य जगासमोर आणले म्हणून या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. आता केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही चित्रपटाबाबत वक्तव्य केले आहे.
हेही वाचा: उर्मिला निंबाळकरने काढले पुरुषी मानसिकतेचे वाभाडे, म्हणाली लाज वाटत..
केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी नुकतीच 'इंडिया इंटरनॅशनल सेंटर' येथे आयोजित करण्याता आलेल्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती. या कार्यक्रमात ‘ग्लोबल कश्मीरी पंडित डायस्पोरा’ (जीकेपीडी) या श्रेणी अंतर्गत ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटातील कलाकारांचा सन्मान करण्यात आला.
हेही वाचा: 'शेर शिवराज'च्या कलाकारांना भेटण्याची सुवर्णसंधी, दिग्पालने दिली ऑफर..
यावेळी विवेक अग्निहोत्री (vivek agnihotri), अनुपम खेर (anupam kher), पल्लवी जोशी (pallavi joshi) आदी कलाकार उपस्थित होते. या सोहळ्यात नितीन गडकरी यांनी 'द काश्मिर फाईल्स' चित्रपटाचे कौतुक केले. 'या चित्रपटाने काश्मीर खोऱ्यातील खरा इतिहास जगासमोर आणला आहे. त्यामुळेच हा चित्रपट लोक दीर्घकाळ लक्षात ठेवतील. काश्मिरी पंडितांना मोठा आणि समृद्ध इतिहास आहे,' असे ते म्हणाले.
'काश्मिरी पंडितांचा छळ करुन त्यांना काश्मिर खोऱ्यातून बाहेर काढले गेले. त्यांच्यावर झालेला अन्याय खरा असून इतकी वर्षे तो लपवण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी तो अत्यंत उत्तम प्रकारे मांडलात. त्यांच्यामुळेच हा इतिहास जगाला कळू शकला. असे महत्वाचे वक्तव्य त्यांनी केले. तसेच कट्टरतावाद लोकशाही आणि धर्मनिकपेक्षतेला संपवते याचे दर्शन घडवणारा हा चित्रपट आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
Web Title: Nitin Gadkari On The Kashmir
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..