Hrithik-Falguni Dance : हृतिक रोशनसोबत फाल्गुनी पाठकने केला डान्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik-Falguni Dance News

Hrithik-Falguni Dance : हृतिक रोशनसोबत फाल्गुनी पाठकने केला डान्स

Hrithik-Falguni Dance News गरबा आणि फाल्गुनी हे ठरलेले गणित आहे. दरवर्षी नवरात्रीला फाल्गुनी पाठक गरबाची रात्र हा कार्यक्रम आयोजित करते. या कार्यक्रमात लोक तिच्या गाण्यांवर नाचतात. मात्र, यावेळी पारंपरिक नृत्या व्यतिरिक्त गायिका स्वतः बॉलिवूड डान्स करताना दिसली. फाल्गुनीचा हृतिक रोशनसोबतचा डान्स व्हिडिओ समोर आला आहे.

देशभरात नवरात्रोत्सव साजरा केला जात आहे. या खास प्रसंगी फाल्गुनी पाठक गरबा आणि दांडिया रात्रीचे आयोजित करते. फाल्गुनी पाठकच्या गाण्यांवर गरबा व दांडिया करायला कोणाला आवडणार नाही. सेलिब्रिटीही यात मागे नाहीत. अभिनेता हृतिक रोशनलाही स्वत:ला रोखता आले नाही. फाल्गुनीने गायलेल्या गाण्यांवर त्याने जबरदस्त डान्स केला.

हेही वाचा: Giorgia Andriani : जॉर्जिया एंड्रियानीने दिले किलर पोझ; पहा सुंदर लूक

या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी फाल्गुनीही स्वत:ला रोखू शकली नाही आणि तिने हृतिक रोशनबरोबर वन टू वन डान्स स्टेप केला. हृतिक रोशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये तो फाल्गुनीसोबत पारंपरिक डान्स स्टेप्स करीत आहे.

पंडालमध्ये आल्यावर हृतिक रोशनने सर्वप्रथम माता राणीला हात जोडले. यानंतर हृतिकनेही आपल्या स्टाईलने चाहत्यांची मने जिंकली. त्याने सर्वांना शुभेच्छा दिल्या. हृतिक रोशन एकटा डान्स करीत नव्हता तर फाल्गुनीनेही त्याच्यासोबत डान्स केला. चाहत्यांना हृतिक-फाल्गुनीचा डान्स आवडला.

एकीकडे फाल्गुनी गात आहे. दुसरीकडे हृतिक रोशन डान्स करीत आहे. हृतिकच्या डान्ससोबतच त्याच्या स्टाइलचेही सगळेच कौतुक करीत आहेत. विक्रम वेधा प्रदर्शित झाल्यानंतर हृतिकचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. ज्यामध्ये तो सार्वजनिक ठिकाणी डान्स करत आहे.