कतरिना कैफच्या 'चिकनी चमेली'वर हृतिक रोशनचा बुक्क्यांचा मार पाहिलात का? हसून व्हाल लोटपोट

दिपाली राणे-म्हात्रे
Tuesday, 17 November 2020

हृतिक रोशनचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

मुंबई- अभिनेता हृतिक रोशन एक उत्तम अभिनेता असण्यासोबतंच एक जबरदस्त डान्सर देखील आहे. त्याच्या चाहते तर त्याच्या डान्ससाठी वेडे आहेत. त्याचे डान्स मुव्ह्ज, सिग्नेचर स्टेप्स प्रचंड व्हायरल होताना पाहायला ंंमिळतात. ज्यावर अनेकदा स्वतः हृतिक रोशन देखील प्रतिक्रिया देताना दिसतो. आता नुकताच हृतिक रोशनचा असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हृतिक रोशनचा हा व्हिडिओ त्याच्या चाहत्याने ट्विटरवर शेअर केला आहे जो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

हे ही वाचा: अभिनेता सोनू सूदलानिवडणूक आयोगाने जाहीर केलं 'पंजाबचा आयकॉन'  

व्हायरल होत असलेल्या हृतिकच्या या व्हिडिओमध्ये तो जबरदस्त ऍक्शन करताना दिसतोय. व्हिडिओमध्ये कधी 'क्रिश' तरी कधी 'धूम २'च्या आर्यन सिंहच्या अवतारात दुश्मनांसोबत फायटिंग करतोय. मात्र या संपूर्ण व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक आहे ते कतरिना कैफचं प्रसिद्ध गाणं 'चिकनी चमेली'चं. या गाण्यासोबत हृतिकचे ऍक्शन सीन्स एडिट केले आहेत. या गाण्यावर हृतिकचा बुक्क्यांचा मार खूपंच मजेशीर वाटतोय. 

हा व्हिडिओ सोशल मिडिया युजर्स आणि हृतिक रोशनच्या चाहत्यांमध्ये खूप पसंत केला जातोय. हा व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की तो आता थेट हृतिक पर्यंतच पोहोचला आहे. त्याने स्वतः देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.

हृतिकने कमेंट करत म्हटलंय, ''हाहाहा, मस्तच.'' याचाच अर्थ हृतिकला देखील हा व्हिडिओ आवडला आहे. हे गाणं हृतिकच्या 'अग्निपथ' सिनेमातीलंच आहे ज्यावर कतरिनाने जबरदस्त डान्स मुव्ह्ज करुन प्रेक्षकांची पसंती मिळवली होती.   

hrithik roshan reacts to a funny video of action scene synced with katrina kaif chikini chameli  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hrithik roshan reacts to a funny video of action scene synced with katrina kaif chikini chameli