बॉलीवूडच्या वेधानं डॉक्टरांनाही चुकीचं ठरवलं,कधीच डान्स-Action करू शकणार नव्हता हृतिक Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan Revealed Doctor Warns Before his debut in kaho na pyar hai

बॉलीवूडच्या वेधानं डॉक्टरांनाही चुकीचं ठरवलं,कधीच डान्स-Action करू शकणार नव्हता हृतिक

Hrithik Roshan:दाक्षिणात्य सिनेमा 'विक्रम वेधा'चा ऑफिशियल रीमेक ३० सप्टेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. सैफ अली खान आणि हृतिक रोशन 'विक्रम वेधा' सिनेमात जोरदार Action सीन्स करताना दिसणार आहेत. पण एक वेळ हृतिकच्या आयुष्यात अशी आली होती की डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तो आता यापुढे कधीच डान्स करु शकणार नाही. पण हृतिकनं त्याच्या जिद्दीनं,मेहनंतीने डॉक्टरांच्या त्या म्हणण्याला चुकीचं ठरवलं. आणि एकापेक्षा एक जबरदस्त स्टंट्स करत आपल्या चाहत्यांना चकीत करून सोडलं. पण हृतिकला डॉक्टरांनी असं का सांगितलं होतं चला जाणून घेऊया. (Hrithik Roshan Revealed Doctor Warns Before his debut in kaho na pyar hai)

हेही वाचा: 'आम्ही मैत्रिणी बनलो असतो पण...',अमृताविषयी सोनाली जरा स्पष्टच बोलली

हृतिक रोशनने २००० साली बॉलीवूडमध्ये 'कहो ना प्यार है' सिनेमातून पदार्पण केलं. या सिनेमातील त्याचं गाणं 'एक पल का जीना' खूप प्रसिद्ध झालं होतं. एवढंच नाही तर आजही ते गाणं बॉलीवूडच्या टॉपच्या गाण्यांमध्ये सामिल आहे. पण या सिनेमाआधीच डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की तो कधीच अॅक्शन सिनेमात काम करु शकत नाही किंवा डान्स करू शकत नाही. कारण त्यासाठी त्याची हेल्थ कंडीशन ठीक नाही. पण अभिनेत्यानं 'धूम','क्रिश','वॉर' सारखे अनेक अॅक्शन सिनेमे केले आहेत. आता तो 'विक्रम वेधा' मध्येही जबरदस्त अॅक्शन सीन करताना दिसणार आहे.

हेही वाचा: महाठग सुकेशसोबत नाव जोडल्यावर चाहतची प्रतिक्रिया चर्चेत; म्हणाली,'योग्य वेळ आली की..'

आपल्या आगामी सिनेमातील एका गाण्याच्या लॉन्चिंग दरम्यानं हृतिकनं याविषयी खुलासा करत म्हटंल आहे की, त्यानं आपल्या हेल्थवर खूप मेहनत घेतली आहे,ज्यामुळे तो आपल्या करिअरमध्ये अॅक्शन आणि डान्स दोन्ही करू शकेल. त्यानं डॉक्टरनं दिलेल्या सक्त ताकीदीचा त्यानं उल्लेख करताना म्हटलं आहे की,''कहो ना प्यार है आधी डॉक्टरांनी सांगितलं होतं की माझी जी हेल्थ कंडीशन आहे त्यानुसार मी सिनेमात कधीच अॅक्शन किंवा डान्स करणं योग्य ठरणार नाही. पण हे दोन्ही मी करु शकलो अन् या गोष्टीमुळे अनेकांसोबत मी देखील आज हैराण आहे. २५ सिनेमात डान्स करणं,अॅक्शन करणं आणि संवाद बोलणं हे सगळं मी कोणत्याही अडचणीविना करु शकलो ही माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे''.

हेही वाचा: 'आलियावर मी पूर्णतः अवलंबून,ती नसेल तर बाथरुमलाही...', हे काय बोलून बसला रणबीर कपूर?

विक्रम वेधामध्ये हृतिक आणि सैफ यांच्यासोबत राधिका आपटे,रोहित सराफ हे कलाकार देखील आहेत. या सिनेमाला पुष्कर आणि गायत्री यांनी दिग्दर्शित केलं आहे. विक्रम वेधा २०१८ साली आलेल्या तामिळ सिनेमाचा हिंदी रीमेक आहे. तामिळ सिनेमात विजय सेतुपति आणि आर.माधवन महत्त्वाच्या भूमिकेत होते.

Web Title: Hrithik Roshan Revealed Doctor Warns Before His Debut In Kaho Na Pyar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..