'आलियावर मी पूर्णतः अवलंबून,ती नसेल तर बाथरुमलाही...', हे काय बोलून बसला रणबीर कपूर? Alia Bhatt, Ranbir Kapoor | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ranbir Kapoor Can not eat or even go to bathroom without finding wife alia

'आलियावर मी पूर्णतः अवलंबून,ती नसेल तर बाथरुमलाही...', हे काय बोलून बसला रणबीर कपूर?

Ranbir Kapoor: रणबीर कपूरने कधीच विचार केला नव्हता की आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर त्याच्या आयुष्यात खूप सुंदर आणि आनंदाचे क्षण भरभरुन वाट्यास येतील. आलियाशिवाय आपण अपूर्ण आहोत असं रणबीर जिकडे-तिकडे म्हणताना दिसत आहे. अगदी आपल्या रोजच्या व्यवहारातल्या साध्या गोष्टी करताना सुद्धा तो आलियावरच अवलंबून राहू लागला आहे. रणबीरला आलिया कुठे दिसली नाही घरात की तो बाथरुमला जायचाही थांबून राहतो ती दिसेपर्यंत,अगदी जेवणही जेवत नाही बापडा. बरं हा खुलासा दस्तुरखुद्द रणबीर कपूरनं एका मुलाखतीत केला आहे.(Ranbir Kapoor Can not eat or even go to bathroom without finding wife alia bhatt)

हेही वाचा: अखेर श्रेयसचं स्वप्न साकार...

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकले आणि लवकरच आता ते आई-बाबा बनणार आहेत. रणबीर आणि आलिया गेल्या जवळपास ५ वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. रणबीर आणि आलिया सध्या चर्चेत आहे ते ब्रह्मास्त्र सिनेमामुळे. सिनेमात शिवा आणि ईशाच्या भूमिकेत दिसून आलेली त्यांच्यामधील केमिस्ट्री लोकांना भलतीच आवडली आहे. रणबीरने नुकत्याच एका मुलाखतीत बोलताना आलियाशी लग्न केल्यानंतर आयुष्यात झालेल्या बदलांवर मनमोकळा संवाद साधला आहे. रणबीर आणि आलियाला जेव्हा विचारलं गेलं की,ते दोघे एकमेकांना कसं सांभाळून घेतात,कसं त्यांच्या नात्याला परिपूर्ण बनवतात यावर रणबीरनं दिलेलं उत्तर जोरदार चर्चेत आलं आहे.

हेही वाचा: नातीनेच केली 'बच्चन' कुटुंबाची पोलखोल

रणबीर कपूर म्हणाला आहे की, ''मी खूप फुशारक्या मारतो की मी स्वतंत्र आहे, कोणावरही अवलंबून नाही, पण मी हे मान्य करीन की मी आलियावर खूपच अवलंबून राहतो आजकाल. तिच्याशिवाय माझं पानही हलत नाही. आलिया कुठे आहे हे मला कळल्याशिवाय मी बाथरुमलाही जात नाही,ना जेवत. आम्ही गप्पा मारत नसलो तरी चालेल किंवा आम्ही रोमॅंटिक मूडमध्ये नसलो तरी चालेल पण फक्त मला ती माझ्या बाजूला बसलेली हवी सतत असं वाटत राहतं. हेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे किंबहुना गरजेचं बनलंय''.

हेही वाचा: 'आम्ही मैत्रिणी बनलो असतो पण...',अमृताविषयी सोनाली जरा स्पष्टच बोलली

'ब्रह्मास्त्र' मधील ईशा आणि शिवा कसे एकमेकांशिवाय अपू्र्ण आहेत असं दाखवलं आहे अगदी तसंच रणबीरचं म्हणणं आहे की,तो आलियाशिवाय अपूर्ण आहे.पण आम्हा दोघांची तुलना शिवा-ईशासोबत केली जाऊ शकत नाही. रणबीर म्हणाला,''शिवा आणि ईशा या सिनेमातील व्यक्तिरेखा आहेत. प्रत्येक नात्याप्रमाणे आमच्याही नात्यात कडू-गोड प्रसंग येतात. पण यातून आम्ही शिकतो आणि एकमेकांसाठी आणखी चांगला जोडीदार बनण्याचा प्रयत्न करतो. आणि ही प्रोसेस कायम सुरु राहिल. असं नाही की आम्ही कायम खूप रोमॅंटिक असतो आणि खूप प्रेमात आकंठ बुडालेलो असतो. प्रेम सगळेच करतात,पण एक संघर्ष देखील आयुष्यात सुरु असतो नात्याचा. खूप कठीण असतं नातं निभावणं,खुप मेहनत घ्यावी लागते ते टिकवायला आणखी मजबूत बनवायला''.

हेही वाचा: वन पीस ड्रेसमध्ये मृणालचा किलर लूक...

तर आलिया भट्ट म्हणाली,''मी आणि रणबीर लांब असतो तेव्हाही ठीकच असतो, पण एकत्र अधिक शोभतो''. आलियानं देखील हे मान्य केलं की रणबीर तिच्याशिवाय काहीच करु शकत नाही. ती म्हणाली,''आरोग्याविषयी रणबीर खूप निष्काळजी आहे. मी नसेन तर तो अगदी तब्येत जास्त बिघडेपर्यंत स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि ही एक गोष्ट त्याची आहे ज्यामुळे मला सतत त्याची काळजी वाटत राहते. आणि त्यामुळे मला त्याबाबतीत सतत त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागतं''.

Web Title: Ranbir Kapoor Can Not Eat Or Even Go To Bathroom Without Finding Wife Alia

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..