एवढी गुर्मी बरी नाही हृतिक, डिलिव्हरी बॉयसोबत...Hrithik Roshan Viral Video | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan Viral Video

Hrithik Roshan Viral Video: एवढी गुर्मी बरी नाही हृतिक , डिलिव्हरी बॉयसोबत...

Hrithik Roshan Viral Video: बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन नुकताच त्याची माजी पत्नी सुजैन खान आणि तिचा प्रियकर अर्सलान गोनीसोबत एका डिनर डेटवर दिसला. यादरम्यान असं काही घडले की सोशल मीडियावर लोकांनी हृतिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

सोशल मीडियावर सध्या तुफान त्याचा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे. अखेर, असं काय घडलं की हृतिकला ट्रोल केलं जात आहे. तर त्याच झालं असं की जेव्हा हृतिक रेस्टॉरंटमधून बाहेर आला तेव्हा त्याचा एक चाहता अभिनेत्यासोबत सेल्फी घेण्यासाठी आला.

कपड्यांकडे पाहून तो फूड डिलिव्हरी बॉय आहे असं दिसतं. तो अभिनेत्याला त्रास न देता सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. व्हिडीओ पाहून असं दिसतं की हृतिकही त्याच्यासोबत फोटोत येण्यासाठी पुढे येतो.

पण तितक्यात हृतिक रोशनचा बॉडीगार्ड तिथे येतो आणि तो डिलिव्हरी बॉयला मागे ढकलतो. हे सर्व घडताना पाहून हृतिकही त्या सर्वांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आता हे दृश्य पापाराझीच्या कॅमेऱ्यात कैद झालं आहे आणि आता यूजर्स त्याला खूप ट्रोल करत आहे.

सोशल मीडियावर लोक अभिनेत्यावर जोरदार टीका करत आहेत. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एका यूजरने त्यावर कमेंट करत लिहिले की, "हे सर्व आमच्यामुळे झाले आणि त्या बिचाऱ्याला कसं ढकललं गेले. लोक काय आहेत ते समजतात." तर दुसर्‍याने लिहिले की, "त्याचा चित्रपट पाहू नये. भाऊ, बिचार्‍याला ढकलून दिलेली ही काय वृत्ती आहे". तर काहींनी लिहिलं की, 'इतका माज कसला?'

अशाप्रकारे या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. त्याचवेळी काही लोकांनी अभिनेत्याच्या चित्रपटाला बॉयकॉट करण्याची धमकीही दिली होती.

यासोबतच काहीजण हे सर्व घडल्यानंतरही हृतिक गप्प का बसला आहे, तो त्याच्या सुरक्षा रक्षकाला का काही बोलला नाही. असा प्रश्न विचारताना दिसले.

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर हृतिक सध्या त्याच्या आगामी 'फायटर' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

टॅग्स :viralVideohrithik roshan