'शाहरुख नव्हे मी बॉलिवूडचा किंग'; ऋतिक कूल डॅडीच्या भूमिकेत

सकाळ ऑनलाईन टीम
Friday, 15 January 2021

प्रसिध्द अभिनेता ऋतिकला बॉलीवूडमध्ये 21 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सोशल मीडिय़ावर एक व्हिडिओ शेयर केला आहे.

मुंबई - कोणाला काय माहिती होतं की तो  भविष्यात इतका मोठा अभिनेता होईल म्हणून, त्याच्यामागे प्रसिध्दी धावत येईल, मोठमोठ्या जाहिराती कंपन्या त्याला आपला ब्रँण्ड अॅम्बेसिडर बनवतील. अॅक्शन चित्रपटांमध्ये त्याची वर्णी लागेल. असे अनेक प्रश्न त्यावेळी कुणाला पडले नसतील. जरी पडले असते तरी त्या प्रश्नांची खरी उत्तरे मिळण्यासाठी वाट पाहावी लागली असती.

प्रसिध्द अभिनेता ऋतिकला बॉलीवूडमध्ये 21 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्तानं सोशल मीडिय़ावर एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्याला त्याच्या चाहत्यांनी याबरोबरच काही सेलिब्रेटींनी जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कहो ना प्यार है हा त्याचा पहिला चित्रपट होता. त्यानं त्यावेळी बॉक्स ऑफीसवर इतिहास घडवला होता. इतकी कमालीची लोकप्रियता या चित्रपटाला मिळाली होती. या चित्रपटाला त्यावेळचा फिल्मफेअरही मिळाले होते. 

कहो ना प्यार है आला त्यावेळी बॉलीवूडच्या भल्या भल्या दिग्दर्शकांना त्यानं विचार करायला भाग पाडले होते. तरुणाईला भावलेला चित्रपट म्हणूनही त्याचे उदाहरण देता येईल. गुरुवारी ऋतिकनं आपल्या मुलांसोबत एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यात त्याने एक टोपी घातली असून त्यावर द किंग असे लिहिले आहे.  आपल्या करिअरला 21 वर्षे झाल्याचा आनंद साजरा करत असताना त्याने शेअर केलेल्या त्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रेहान आणि रिधान यांच्याबरोबर त्याने सायकल सवारी केली आहे. यावेळी ऋतिकनं त्या व्हिडिओला कॅप्शन देऊन त्यावर हॅश टॅग डॅडीकूल असे लिहिले आहे. 

'आई तु बघ, एक दिवस या जगावर बोलक्या बाहुल्यांचं राज्य असेल'

राजेश रोशन यांनी ऋतिकच्या पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. त्यात अमिषा पटेलनं भूमिका केली होती. 10 जानेवारीला ऋतिकनं आपला जन्मदिन साजरा केला. त्यावेळी त्यानं त्याच्या फायटर नावाच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली. ज्यात दिपिका पादुकोण दिसणार आहे. सिध्दार्थ आनंद यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी 2019 मध्ये वॉर नावाचा चित्रपट बनवला होता. 
 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hrithik roshan share experince of 21 years in bollywood video viral