'आई तु बघ, एक दिवस या जगावर बोलक्या बाहुल्यांचं राज्य असेल'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

भरत जाधव हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता आहे. अनेक व्यावसायिक आणि  प्रायोगिक नाटकांमधुन भरतने प्रेक्षकांचें मनोरंजन केले आहे.अतिशय कष्टाने आणि जिद्दीने भारतने मराठी चित्रपट सुष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत व्हॅनिटी व्हॅन असणारा भरत हा पहिला अभिनेता आहे.

मुंबई -  भरत जाधव हा मराठी चित्रपट सृष्टीतील एक उत्तम अभिनेता आहे. अनेक व्यावसायिक आणि  प्रायोगिक नाटकांमधुन भरतने प्रेक्षकांचें मनोरंजन केले आहे. अतिशय कष्टाने आणि जिद्दीने भारतने मराठी चित्रपट सुष्टीमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपट सृष्टीत व्हॅनिटी व्हॅन असणारा भरत हा पहिला अभिनेता आहे. सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, आमच्या सारखे आम्हीच या नाटकांमुळे भरतला खूप प्रसिद्धी मिळाली. भरतच्या  प्रत्येक नाटकाला हाऊस फुलचा बोर्ड लागतो.

श्रीमंत दामोदर पंत या नाटकातील "गोड गोजिरी लाज लाजिरी" या गाण्यावरील भरतच्या एन्ट्रीला प्रेक्षकांचा नेहमीच वन्स मोर मिळतो. सही रे सही या नाटकांमधील सगळ्या भूमिकांचा अभिनय भरत एकटा करतो त्यामुळे या नाटकातील त्याच्या अभिनय कौशल्याचे नेहमीच  कौतुक केले जाते. जत्रा, खबरदार, डावपेच, पछाडलेला, गलगले निघाले या भरतच्या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भरतच्या पछाडलेला या चित्रपटला 18 वर्ष झाली आहेत. चित्रपटामधील हॉरर इफेक्ट्स आणि बोलक्या बाहुल्यांमुळे प्रेक्षकांची पसंती आजही या चित्रपटाला मिळते. बोलक्या बाहुल्यांचे खेळ करणाऱ्या रामदास पाध्ये यांनी या चित्रपटातील बोलक्या बाहुल्यांचा भाग सादर केला होता. या चित्रपटातील प्रसिद्ध पात्र इनामदार भुसनळे सोबतची एक खास आठवण नुकतीच भरतने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

‘मास्टर’चा बॉलीवूड अवतार येणार; 'कबीर सिंग'च्या निर्मात्यांनी घेतले हक्क

भरतने रामदास पाध्ये आणि त्यांची पत्नी अपर्णा पाध्ये यांच्या सोबत फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये बोलका बाहूला इनामदार भुसनळे, रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये आणि भरत दिसत आहे. झपाटलेला चित्रपटात लक्ष्या मामाच्या तोंडी एक संवाद आहे की "आई तु बघ एक दिवस या जगावर बोलक्या बाहुल्यांच राज्य असेल' आज कार्टून्स चॅनल्स आणि मुलांच्या मनावर कार्टून्सचा प्रभाव पाहिला तर हे काही प्रमाणात खरं वाटतं असे कॅप्शन भरत यानं दिलं आहे.

तांडव झाला ट्रोल, हिंदू देवतांची केली बदनामी; पहिली 15 मिनिटे फारच वादग्रस्त 

lockdown नंतर भरत "पुन्हा सही रे सही" नाटकाच्या प्रयोगांनिमित्त महाराष्ट्रामध्ये दौरा करत आहे. या प्रयोगांना प्रेक्षक भरघोस प्रतिसाद देत आहेत. नाशिकचा प्रयोग हाऊस फुल झाल्याची बातमी नुकतीच भरतने सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bharat Jadhav Pachadlela Marathi Movie World Talking Dolls