
अभिनेता हृतिक रोशन नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या धूम धाममध्ये केलं आहे. या खास दिवशी त्याने त्याच्या पहिल्या सिनेमातील गाण्यावर केवळ जबरदस्त डान्सच केला नाही तर प्रसिद्ध गायक मिका सिंहसोबत गाणं देखील गायलं.
मुंबई- नवीन वर्षात लोक जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. २०२० मधील कडू आठवणींना विसरुन २०२१ हे वर्ष नवीन आनंद घेऊन येईल अशी आशा व्यक्त करत आहेत. बॉलीवूड सेलिब्रिटी नवीन वर्षाचं स्वागत मोठ्या जल्लोषात करत आहेत. अभिनेता हृतिक रोशन नवीन वर्षांचं स्वागत मोठ्या धूम धाममध्ये केलं आहे. या खास दिवशी त्याने त्याच्या पहिल्या सिनेमातील गाण्यावर केवळ जबरदस्त डान्सच केला नाही तर प्रसिद्ध गायक मिका सिंहसोबत गाणं देखील गायलं. सोशल मिडियावर हृतिक रोशन आणि मिकाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
व्हिडिओ: 'त्रिभंगा'मध्ये काजोलचा पॉवरफुल लूक, टिझर रिलीज
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये हृतिक रोशन 'कहो ना प्यार है' सिनेमातील हिट गाणं 'एक पल का जीना' हे गाणं गात मिकाच्या सुरात सुर मिसळत आहे सोबतंच या गाण्यावर हुक स्टेप देखील करत आहे जे लोकांना खूप आवडत आहे. प्रसिद्ध गायक मिका सिंहने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिलंय, ''हॅप्पी न्यु इयर. हृतिक रोशन, जायद खान, करण बावा आणि राकेश रोशनसोबत खुपंच शानदार पार्टी केली. धन्यवाद कुकु बावा साहेब आणि राकेश रोशन अशा प्रकारे पार्टी दिल्याबद्दल. तुम्हा सगळ्यांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा. तुम्हा सगळ्यांना चांगलं आरोग्य आणि खुप सारा आनंद लाभो. गुडबाय २०२०, वेलकम २०२१.''
गायक मिका सिंहने काही दिवसांपूर्वीच लॉकडाऊनमुळे कामवर परिणाम झाल्याचं म्हटलं होतं. त्याने म्हटलं होतं की लॉकडाऊनच्या या गेल्या ८ महिन्यात त्याच्याकडे काहीही काम नव्हतं. नुकतंच त्याने 'सयोनी' या सिनेमासाठी एक पप्पी गीत गायलं आहे. हृतिक रोशनच्या कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्याच्या क्रिशच्या पुढच्या भागाची प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे. गेल्या वर्षी हृतिक 'वॉर' आणि 'सुपर ३०' सिनेमात दिसून आला होता.
hrithik roshan sing and dances in ek pal ka jeena song with mika singh at new year bash video viral