Vikram Vedha विषयी हृतिकच्याच मनात चुकचुकली शंकेची पाल; म्हणाला,'माहीत नाही सिनेमा..' Hrithik Roshan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hrithik Roshan talks about vikram vedha boxoffice collection

Vikram Vedha विषयी हृतिकच्याच मनात चुकचुकली शंकेची पाल; म्हणाला,'माहीत नाही सिनेमा..'

Vikram Vedha: बॉलीवूडचा ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा हृतिक रोशन सध्या 'विक्रम वेधा' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ब्रह्मास्त्रनंतर ट्रेड अॅनलिसिस्टना आता 'विक्रम वेधा'कडून खूप अपेक्षा आहेत. म्हटलं जातंय की,हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करू शकतो. या सिनेमात हृतिक वेधाच्या भूमिकेत तीन वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. सिनेमाचं प्रदर्शन तोंडावर आलं असताना हृतिकने एका मुलाखतीत 'विक्रम वेधा'च्या बॉक्सऑफिस कलेक्शनविषयी शंका व्यक्त केली आहे,जिनं आता त्याच्या चाहत्यांना टेन्शनमध्ये आणलं आहे.(Hrithik Roshan talks about vikram vedha boxoffice collection)

हेही वाचा: घट्ट पॅंट घातली म्हणून इराणमध्ये अभिनेत्रीला नेलं पकडून, पुढे जे घडलं ते पाहून..

नुकतंच हृतिक रोशन आणि विक्रम वेधाचे दिग्दर्शक पुष्कर-गायत्री यांनी मीडियासोबत आपल्या सिनेमासंदर्भात बातचीत केली. यादरम्यान जेव्हा हृतिकला विचारलं की याआधी रिलीज झालेल्या त्याच्या 'वॉर' सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाई केली होती तर मग 'विक्रम वेधा'ही तिच कमाल दाखवणार का? तेव्हा हृतिकनं याबाबतीत ठाम उत्तर न देता आपल्या मनात याविषयी धाकधूक आहे,आपण नर्व्हस आहोत असं म्हटलं. तो म्हणाला,''एक मन म्हणतंय सिनेमा चांगली कमाई करेल. पण खरं सांगू तर मला सिनेमाच्या बॉक्सऑफिसवरील कमाई विषयी आताच काही ठामपणे सांगता येणार नाही''.

हेही वाचा: 'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

हृतिक पुढे म्हणाला,''मी आपल्या आयुष्यात नेहमी या गोष्टीचा आनंद बाळगेन की मला 'विक्रम वेधा' सारखा सिनेमा करायला मिळाला. एक सिनेमा ज्याच्या कथेला खूप ताकदीनं लिहिलं गेलंय आणि तितकंच प्रगल्भपणे मांडलं गेलं आहे. मी सिनेमा रिलीज झाल्यानंतरही मला वाटतंय या सिनेमामध्ये बुडालेलो असेन,त्याच्याच विचारात राहीन. पण आता मी शॉकमध्ये आहे,टेन्शन आलंय. पुष्कर-गायत्रीनं सिनेमाला लिहिलंय. मला खरंतर यावर केस स्टडी करायची आहे. आणि मला वेळ मिळाला तर मी नक्की लिहिन ती केस स्टडी, यांनी कथेला कुठून सुरुवात केली,कशी ती लिहिली यासंदर्भात''.

हेही वाचा: Boycott Vikram Vedha: 'मुलाचं नाव राम तर नाही ठेवणार...', सैफच्या व्हिडीओनं खळबळ

'विक्रम वेधा' हा हृतिकचा २५ वा सिनेमा आहे. सिनेमाच्या टीझरला,ट्रेलरला,पोस्टरपासून गाण्यांना देखील नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. सिनेमात हृतिक रोशन तीन वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसणार आहे. हृतिक व्यतिरिक्त सैफ अली खान, राधिका आपटे देखील महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमध्ये दिसणार आहेत. 'विक्रम वेधा' हा साऊथ मधला सुपरहिट सिनेमा आहे ज्याच्या रीमेकमध्ये हृतिक-सैफ यांनी काम केलं आहे. साऊथच्या सिनेमात आर माधवन आणि विजय सेतुपति यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

हेही वाचा: 'Madhubala आणि दिलीप कुमार यांच्यातील नातं प्लीज...', बायोपिकनं वाढवलं बहिणीचं टेन्शन

हृतिक यानंतर लगेचच फायटर सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबच दीपिका पदूकोण काम करतेय. मीडिया रीपोर्टमधून समोर आलं आहे की फाइटर हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन सिनेमा असणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सिद्धार्थनं केलं आहे. फायटर व्यतिरिक्त हृतिक क्रिश ४ च्या शूटिंगला देखील लगेचच सुरुवात करणार असल्याचं बोललं जात आहे.