'कृपा करुन मधुबाला-दिलीप कुमार यांची प्रेमकहाणी..';मधुर भूषण काकुळतीला येऊन म्हणाल्या

काही महिन्यांपूर्वीच मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातील प्रेमकहाणीवर मोकळेपणानं बोलणाऱ्या मधुर भूषण यांनी आता यु-टर्न घेतल्यानं सगळेच हैराण झालेयत.
Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalized
Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalizedGoogle

Madhubala Biopic: अभिनेत्री पद्मिनी कोल्हापूरे यांचे पती टुटू शर्मा, मधुबाला यांच्यावर बायोपिक बनवत आहेत ही गोष्ट आता जगप्रसिद्ध झालीय. अर्थात यामुळे जो वाद रंगलाय तो वेगळा चर्चेत राहिलाय. कारण जेव्हापासून मधुबाला यांच्यावर बायोपिक येणार हे जाहीर झालं तेव्हापासून मधुबाला यांची बहिण मधुर भूषण टेन्शनमध्ये आल्यात. हेच नाही तर यामुळे मधुर भूषण यांनी टूटू शर्मा यांना कायदेशीर नोटीसही पाठवली आहे. मधुर भूषण यांच्या एका निर्णयामुळे सगळेच हैराण झालेत. कारण ज्या मधुर भूषण यांनी काही महिन्यांपूर्वी मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातील प्रेमकहाणीवर मोकळेपणाने संवाद साधला होता त्याच आता म्हणू लागल्यात हे सगळं लोकांसमोर आलं नाही पाहिजे. आता मुद्दा उठतोय की मधुर भूषण यांना असं का वाटत आहे?(Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalized)

Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalized
'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

ईटाईम्सच्या रीपोर्टनुसार,मधुर भूषण यांना मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातील प्रेमाचं नातं पडद्यावर यायला नको आहे. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मधुर भूषण यांना भीती आहे की त्यांच्या बहिणीच्या त्या प्रेमाच्या नात्याला चुकीच्या पद्धतीनं पडद्यावर दाखवलं जाईल. उगाचच मसालेदार बनवलं जाईल. सूत्रांच्या म्हणण्यानुसार,जर बायोपिकमध्ये मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्यातील नात्याचा थोडासा उल्लेख केला जाईल तर मधुर भूषण यांना काहीच हरकत नाही. पण त्यांना भीती वाटतेय की नेहमीप्रमाणे सिनेमावाले याला मोठं करुन दाखवतील.

Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalized
Boycott Vikram Vedha: 'मुलाचं नाव राम तर नाही ठेवणार...', सैफच्या व्हिडीओनं खळबळ

फेब्रुवारी २०२२ च्या एका मुलाखतीत मधुर भूषण यांनी मधुबाला आणि दिलीप कुमार यांची लव्ह स्टोरी आणि त्यांच्या नात्यात आलेला दुरावा याविषयी भाष्य केलं होतं. मधुर भूषण म्हणाल्या होत्या की, ''मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या दरम्यान 'नया दौर' सिनेमाच्या वेळेस काही खटके उडाले आणि दुरावा निर्माण झाला. मधुबाला आणि दिलीप कुमार दोघांनीही एकमेकांना त्यावेळी खुप सुनावलं होतं,आणि मग पुढे सगळंच बिघडत गेलं. मधुर यांच्या मते,कदाचित देवालाच मंजूर नव्हतं ते नातं आणि म्हणूनच ते तिथेच संपलं''.

Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalized
गोल्डर्न गर्ल बनलेल्या रश्मिकानं दिल्या किलर पोझ..

मधुर भूषण यांनी सांगितलं होतं की,बी आर चोप्रा यांनी 'नया दौर' सिनेमाचं शूटिंग ग्वाल्हेरच्या डोंगरकपारीच्या भागात करु नये असा त्यांच्या वडीलांचा हट्ट होता. कारण तिथे त्याआधी काही महिलांसोबत गैरप्रकार घडले होते. अशात मग मधुबाला यांच्या वडीलांना आपल्या मुलीच्या सुरक्षेची चिंता वाटणं स्वाभाविक होतं. या गोष्टीवरनं मग मधुबाला आणि त्यांच्या वडीलांमध्ये वाद रंगला. दोघंही आपल्या मुद्दयावर अडून बसले.

आणि या प्रकरणात दिलीप कुमार यांनी मधुबालाची साथ न देता बी.आर.चोप्रा यांची बाजू घेतली आणि मधुबाला यांच्या कुटुंबाच्या विरोधात अखेर केस दाखल केली गेली. तेव्हा मधुबाला यांना वाटत होतं की दिलीप कुमार यांनी आपल्या कुटुंबाची माफी मागावी, पण दिलीप कुमार यांनी असं करण्यास ठाम नकार दिला. आणि मग हाच वाद पुढे इतका टोकाला गेला की दोघांमधील नातं तिथेच संपलं.

Madhur Bhushan does not want sister madhubala love story with dilip kumar to be sensationalized
हॉट...'चहा' की 'तितिक्षा'...

तर काही दिवसांपूर्वी मधुबाला यांच्या बायोपिकवर निर्माते टुटू शर्मा म्हणाले होते की,''मी मधुबाला यांच्यावर जी बायोपिक बनवत आहे ती 'मधुबाला: दर्द का सफर' या सुशीला कुमारी यांच्या पुस्तकावर आधारित आहे. मधुबाला खूप प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व होत्या. त्यामुळे त्यांचं आयुष्य पडद्यावर दाखवणं गरजेचं आहे आणि लोकांना त्यांची ओळख होणं देखील महत्त्वाचं आहे''.

''कोणत्याही प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वावर सिनेमा बनवण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कारण ते समाजासाठी आदर्श असतात,आणि त्यांच्याविषयी जाणून घेण्याचा हक्क समाजाला असतो. आणि कोणीच अशा व्यक्तींसाठी कॉपीराइटचा दावा करू शकत नाही,त्यांचे नातेवाईकही नाही. जर असं असतं तर आपल्या देशातील अनेक दिग्ग्जांवर, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांवर सिनेमे बनले ते कुणी पाहिलेच नसते. टुटू शर्मा आजही आपल्या त्या मतावर ठाम आहेत''.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com