रजनीकांत हेल्थ अपडेट: आजही हॉस्पिटलमध्ये राहणार रजनीकांत, सध्या प्रकृती स्थिर

दिपाली राणे-म्हात्रे
Saturday, 26 December 2020

हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना औषधं देऊन त्यांचा रक्तदाब कंट्रोलमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. 

मुंबई- देशातील सगळ्यात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असलेल्या सुपरस्टार रजनीकांत यांना शुक्रवारी रक्त दाबामध्ये होणा-या चढउतारामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. हैद्राबादमधील अपोलो हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांना औषधं देऊन त्यांचा रक्तदाब कंट्रोलमध्ये आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. डॉक्टरांची टीम त्यांच्यावर देखरेख ठेवून आहे. 

हे ही वाचा: अभिनेत्री रिंकु राजगुरुला बसला लॉकडाऊनचा मोठा फटका, लंडनमध्ये अडकली  

अभिनेते रजनीकांत यांचा रक्तदाब अजुनही नॉर्मल झालेला नाही. त्यामुळे आजही ते हॉस्पिटलमध्येच राहणार आहेत. जो पर्यंत त्यांचा रक्तदाब सामान्य होत नाही तोपर्यंत त्यांच्यावर उपचार करुन मगच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी जाहीर केलेल्या स्टेटमेंटनुसार, त्यांच्यामध्ये इतर कोणत्याही आजाराची लक्षणं नाहीत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. डॉक्टरांची टीम त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काल रात्री १० वाजल्यानंतर रजनीकांत यांचे हेल्थ अपडेट जाहीर करण्यात आले. 

सिनेइंडस्ट्रीतील अनेकांनी रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयीचे अपडेट्स घेतले आहेत. अभिनेते कमल हासनने रजनीकांत यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करत त्यांनी लवकरात लवकर ठीक व्हावं यासाठी प्रार्थना केली आहे. कमल हासन यांनी ट्विट करत त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली. ॉरजनीकांत यांच्या सिनेमाच्या शूटींगदरम्यान टींममधील सदस्य कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले होते. त्यानंतर रजनीकांत यांनी कोरोना टेस्ट केली असता त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आढळून आला.   

rajinikanth health update actor admitted to the hospital due to severe fluctuation in blood pressure  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajinikanth health update actor admitted to the hospital due to severe fluctuation in blood pressure