esakal | हृतिक रोशनला मुंबई क्राइम ब्रांचकडून समन्स; कंगनाचं ईमेल प्रकरण भोवणार?

बोलून बातमी शोधा

kangana hrithik}

२०१६ चं हे प्रकरण आता सायबर सेलकडून सीआययूकडे ट्रान्सफर करण्यात आलं आहे.

हृतिक रोशनला मुंबई क्राइम ब्रांचकडून समन्स; कंगनाचं ईमेल प्रकरण भोवणार?
sakal_logo
By
स्वाती वेमूल

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनला मुंबई क्राइम ब्रांचच्या सीआययूतर्फे समन्स बजावण्यात आले आहेत. हृतिक रोशनने अभिनेत्री कंगना राणावतविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच्या तक्रारीनुसारच तपास करण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहेत. कंगनाने सतत ईमेल्स पाठवून त्रास दिल्याची तक्रार हृतिकने केली होती. 

२०१६ चं हे प्रकरण आता सायबर सेलकडून सीआययूकडे ट्रान्सफर करण्यात आलं आहे. हृतिकच्या तक्रारीचा पुन्हा एकदा नव्याने तपास करण्यात येणार आहे. याचसाठी त्याला चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहेत. 

हेही वाचा : इंडस्ट्रीतला नवरा नको गं बाई!

काय होता वाद?
अभिनेत्री कंगना व हृतिक एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. याविषयी कंगना एका मुलाखतीत मनमोकळेपणाने व्यक्त झाली होती. त्यावेळी तिने हृतिकवर अनेक गंभीर आरोपसुद्धा केले होते. कंगनाने हृतिकचा उल्लेख 'silly ex' असा केला होता. यावरून हृतिकने तिला कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्याचसोबत कंगनासोबत कोणतेही प्रेमसंबंध नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. हृतिकच्या कायदेशीर नोटीशीत कंगनाकडून मानसिक छळ झाल्याचा आरोप करण्यात आला होता. कंगनाने ला १४३९ ईमेल्स पाठवून मानसिक त्रास दिला, ज्यांना मी काहीच उत्तर दिलं नव्हतं, असं त्याने त्यात म्हटलं होतं. तर दुसरीकडे हृतिकने दिलेल्याच ईमेल आयडीवरून आम्ही संपर्क साधत होतो, असं कंगना म्हणाली होती. इतकंच नव्हे तर सुझान खानसोबत घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तो ईमेल आयडी खासगी ठेवण्यात आला होता, असंही ती म्हणाली होती. याच ईमेल्सच्या बाबतीत आता नव्याने तपास होणार आहे.