Video : हृतिकचे 'सुपर 30' ते 'वॉर' ट्रान्सफॉर्मेशन बघून व्हाल थक्क!

वृत्तसंस्था
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

हृतिकचा 'सुपर 30' ते 'वॉर' या जबरदस्त ट्रान्सफोर्मेशनवर हृतिकने एक व्हिडिओ शेअर केलाय यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

चित्रपटांसाठी आपल्या शरिरयष्टावर मेहनत घेणारे अनेक अभिनेते आहेत. यात विशेष नाव घेतलं जातं ते हृतिक रोशनचं! हृतिकचा 'वॉर' हा चित्रपट नुकताच रिलीज झालाय. यातील त्याच्या बॉडीवरून अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. त्याच्या वॉरमधील लूकवरून जोरदार चर्चा सुरू आहे. हृतिकचा 'सुपर 30' ते 'वॉर' या जबरदस्त ट्रान्सफोर्मेशनवर हृतिकने एक व्हिडिओ शेअर केलाय यावरून सोशल मीडियात चर्चा सुरू आहे. त्याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

'सिंदूर खेला' वरून केलेल्या टीकेवर नुसरतचा मौलवींना 'करारा जवाब'

भूमिकेची मागणी असेल त्याप्रमाणे अभिनेत्याला आपली शरिरयष्टी बदलावी लागते. 'सुपर 30'मध्ये आनंद कुमार यांची भूमिका हृतिकने साकारली होती, तेव्हा त्याला सामान्य घरातील एक बुद्धीमान शिक्षक साकारायचा होता. त्याप्रमाणे ये चित्रपटासाठी त्याला समान्य व्यक्तिरेखेप्रमाणे दिसायचे होते. त्यानंतर वॉरचे शूटींग सुरू झाले. यात त्याला मिलिटरी अधिकाऱ्याची भूमिका साकारायची होती. यासाठी त्याला भारदस्त दिसणे आवश्यक होते. त्याप्रमाणे त्याने डाएट व व्यायामास सुरवात केली. त्याने शेअर केलेल्या व्हिडिओत सुपर 30 मधील आनंद कुमार ते वॉरमधील कबीर असा प्रवास दाखविण्यात आला आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Transformation film

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan) on

आनंद कुमारला थोडं पोट आलेलं, तर कबीरला सिक्स पॅक्स अॅब्स, आनंद कुमारची सामान्य राहणी तर कबीरचा रफटफ, आनंद कुमार शांत तर कबीर कायम अॅक्शनसाठी रेडी असलेलाय असे टोकाचे व्हेरिएशन हृतिकला साधावे लागले. या सगळ्यात महत्त्वाची होती ती म्हणजे शरिरयष्टी... हृतिकचा हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना नक्कीच इन्स्पिरेशन मिळेल.

अनेक अभिनेते आपल्या पिळदार शरिरयष्टीचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. पण हृतिक या सर्व गोष्टींचं उत्तम उदाहरण आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे. वॉरने तसेच सुपर 30ने बॉक्स ऑफिसवर दर्जेदार कमाई केली आहे. त्यामुळे सर्वच स्तरांतून हृतिकचे कौतुक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hritik Roshan Shared his body transformation from super 30 to war on Instagram