हृता दुर्गुळेचा 'अनन्या' लवकरच सिनेमागृहात; जाणून घ्या तारीख,पहा टीझर

हृता दुर्गुळेनं सोशल मीडियावर ही बातमी शेअर करताना चाहत्यांना एक आवाहन देखील केलं आहे,ज्याची चर्चा रंगू लागली आहे.
Hruta durgule 'Ananya' Movie Release Date Confirm
Hruta durgule 'Ananya' Movie Release Date ConfirmInstagram
Updated on

प्रताप फड दिग्दर्शित 'अनन्या'(Ananya) या चित्रपटाची(Movie) सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. नुकतीच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख(Release Date) जाहीर करण्यात आली असून येत्या २२ जुलै रोजी ‘अनन्या’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याव्यतिरिक्त या चित्रपटाचे टिझरही(Teaser) झळकले आहे. सायकलवर स्वार होत, आभाळात उत्तुंग भरारी घेणारी, आभाळाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करणारी एक आगळीवेगळी ‘अनन्या’ दिसत आहे. यात हृता दुर्गुळे(Hruta Durgule) ‘अनन्या’ची व्यक्तिरेखा साकारत असून तिची जिद्द आणि जीवनाकडे बघण्याची सकारात्मकता यात पाहायला मिळणार आहे

Hruta durgule 'Ananya' Movie Release Date Confirm
प्रसिद्ध टी.व्ही अभिनेत्याच्या पत्नीनं केलं टक्कल; कारण ऐकून व्हाल थक्क

अनन्या’चे दिग्दर्शक प्रताप फड म्हणतात, "या चित्रपटाच्या सकारात्मक पोस्टरलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आता टीझरही प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ‘अनन्या’ म्हणजे इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक अनन्यसाधारण व्यक्तिमत्वाची ‘अनन्या’ लवकरच सर्वांच्या भेटीला येणार आहे. आयुष्य किती सुंदर आहे, याची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे. चित्रपटगृहातून बाहेर जाताना प्रेक्षकांना आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोन पूर्णपणे बदलेल, हे मी खात्रीने सांगतो. अनन्याचा हा एक प्रेरणादायी प्रवास आहे.’’

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मिती 'अनन्या' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा प्रताप फड यांनी सांभाळली आहे. ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची जबाबदारी निभावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com