ऋताने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. Hruta Durgule Marriage News,Man Udu Udu Zala Fame | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hruta Durgule

ऋता दुर्गुळेनं जाहीर केली लग्नाची तारीख...कधी?

'मन उडु उडु झालं' ह्या मालिकेतनं सर्वांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. सुंदर चेहरा व उत्तम अभिनयाच्या जोरावर ऋतानं सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत तिनं साकारलेल्या दीपू ह्या भूमिकेचं भरपूर कौतूकही होतंय. सकाळ डिजिटलला दिलेल्या विशेष मुलाखतीत ऋता(Hruta Durgule)अनेक विषयांवर मनमोकळेपणानं बोलली. अपघातानं तिचा अभिनयक्षेत्रात झालेला प्रवेश ,तिचा फिटनेस मंत्रा,मानसिक स्वास्थ्य,तिच्या आवडी-निवडी,सोशल मीडिया आणि महत्त्वाचं म्हणजे लग्न अशा अनेक विषयांवर ती भरभरून बोलली आहे.

हेही वाचा: हृताच्या हृदयाचा ठाव घेणारा प्रतीक आहे तरी कोण?

ऋता म्हणते,''अभिनय क्षेत्रात येण्याचा मानस माझा मुळीच नव्हता. मी अपघाताने या क्षेत्रात आले. खरं तर कॉलेजमध्ये मास मीडियाचं शिक्षण घेत असताना प्रोजेक्टसाठी मी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. टाईमपास म्हणून ऑडिशन दिली होती आणि माझं 'दुर्वा' मालिकेत मुख्य भुमिकेसाठी सिलेक्शन झालं. आतापर्यंत जेवढ्या भूमिका साकारल्या आहेत तसे आपण मुळीच नाही असं ती आवर्जुन सांगते. 'दुर्वा','फुलपाखरु' आणि आताच्या 'मन उडु उडु झालं' (Man Udu Udu Zala) ह्या सर्वच मालिकेतनं साकारलेल्या भूमिका आणि मी यात मुळीच साम्य नाही. मी प्रत्यक्षात खूप वेगळी आहे. 'मन उडू उडु झालं' या मालिकेतील दीपू सारखी इतकी समंजस तर मी मुळीच नाही. आतापर्यंतच्या सर्वच मालिकांमधनं ऋताचे रोमॅंटिक ट्रॅक्स नेहमीच पसंद केले गेलेयत. थोडक्यात तिला स्क्रीनवर रोमान्स करताना पाहून लोकांना आवडतं. पण ऋता मात्र म्हणतेय की,''तिला रोमॅंटिक सीन देणं कठीण जातं. आता सरावानं थोडा कम्फर्ट निर्माण झाला असला, तरी पूर्वी रोमॅंटिक सीन द्यायचं म्हटलं की मला खूप दडपण यायचं. मला जमणारच नाही असं वाटायचं'',असं ऋता म्हणाली. ऐका ऋता दुर्गुळे काय म्हणाली.

घरातनं आईवडिलांचा आणि भावाचा सपोर्ट मिळाला नसता तर आज ८-९ वर्ष मी जे काम करतेय ते करू शकले नसते असं ऋतानं आवर्जून नमूद केलं. आपल्या बिझी शेड्युलमधनं वेळ काढत आपण आपला वाचनाचा छंद जोपासतो. वाचनामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते असं पुढे ती म्हणाली. आजकाल बरेच कलाकार सोशल मीडियावर व्यक्त होतात पण मला मात्र तिथे व्यक्त होणं आणि उगाच वादात अडकणं आवडत नाही. मला जर अशा विषयांवर व्यक्त व्हायचं असेल तर माझे काही खास लोकं आहेत ज्यांच्यासमोर मी व्यक्त होते. 'फिटनेस' ह्या कलाकारांच्या जिव्हाळ्याच्या आणि निकडीच्या विषयावरही ऋता व्यक्त झाली. फीटनेसविषयी बोलताना ऋता म्हणाली,''लॉकडाऊनमध्ये वजन वाढलं होतं पण आता मी डॉक्टरांच्या सल्ल्याने डाएट व्यवस्थित सांभाळून माझ्या फीटनेसकडे कटाक्षाने लक्ष देतेय.''

''मला सगळं जेवण करता येतं पण ते बनवायचा मात्र खुप कंटाळा आहे. पण जर वेळ आली कधी जेवण करायची तर आपलं अडणार नाही,आपण ते नक्की करू'' असं ती पुढे म्हणाली. काही दिवसांपूर्वीच ऋताने तिच्या बॉयफ्रेंडसोबतचे फोटो तिच्या सोशल मीडियावर शेअर केले होते. प्रतिक शहा असे त्याचे नाव असून हिंदी मालिकांमध्ये तो दिग्दर्शनाचं काम करतो. यावरुन तिच्या लग्नाविषयी तिला छेडलं असता ती तडक म्हणाली,''लग्न करणार पण पुढच्या वर्षी. आता कामात थोडी व्यस्त आहे. त्यामुळे शॉपिंगला वेळ मिळणार नाही,त्यामुळे २०२२ मध्ये मी लग्न करणार आहे.''

loading image
go to top