वाण नाय पण गुण लागला, मराठीलाही रिमेकची लागण, हृता - वैभवचा Circuit या साऊथ सिनेमाचा रिमेक? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

hruta durgule, vaibhav tatwawadi, circuit marathi film, kali

वाण नाय पण गुण लागला, मराठीलाही रिमेकची लागण, हृता - वैभवचा Circuit या साऊथ सिनेमाचा रिमेक?

Circuit Marathi Movie Teaser: हृता दुर्गुळे (Hruta Durgule) आणि वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) यांच्या सर्किट सिनेमाचा टिझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. रोमान्स, ऍक्शन आणि थ्रिलरचा तडका या सिनेमाला आहे.

पण हा मराठी सिनेमा एका साऊथ सिनेमाचा रिमेक आहे हि गोष्ट फार कमी जणांना माहीत असेल. बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमांचा रिमेक करण्याची परंपरा सुरु आहेच. आता मराठी इंडस्ट्रीला पण रिमेकची लागण लागल्याची चर्चा सुरु झालीय.

(Hruta durgule - vaibhav tatwawadi circuit Remake of South movie )

वाण नाही पण गुण लागला, असं म्हणत मराठी इंडस्ट्रीत सुद्धा रिमेकचा प्रवाह सुरु होतेय अशी चर्चा सुरु झालीय.

हृता आणि वैभव यांचा सर्किट हा सिनेमा प्रसिद्ध साऊथ सिनेमांचा रिमेक आहे. डुलकीर सलमान आणि साई पल्लवी यांची भूमिका असलेला कली हा सिनेमा २०१६ ला रिलीज झालेला. सर्किट हा मराठी सिनेमा याच साऊथ सिनेमांचा रिमेक आहे.

डुलकीर सलमान आणि साई पल्लवी यांच्या कली सिनेमात रागाच्या भरात माणूस संकटांच्या कचाट्यात कसा सापडू शकतो, याचं उत्कंठावर्धक कथानक पाहायला मिळतं. याच साऊथ सिनेमाचा रिमेक सर्किट हा मराठी सिनेमा आहे.

वैभव तत्ववादी आणि हृता दुर्गुळे अनुक्रमे डुलकीर आणि साईची भूमिका साकारणार आहेत. मूळ सिनेमा जबरदस्त असल्याने सर्किट सुद्धा चांगला असेल याची प्रेक्षकांना आशा आहे

भालजी पेंढारकर यांचा नातू आकाश पेंढारकर हा गेली अनेक वर्षे मराठी मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. अनेक निर्मिती संस्था आणि चॅनल्समध्ये त्यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.

"कच्चा लिंबू", "होम स्वीट होम", "मस्का", "भेटली तू पुन्हा", "पावनखिंड" अशा अनेक चित्रपटांची प्रस्तुती तर "चोरीचा मामला" या चित्रपटाची निर्मिती आकाश पेंढारकर यांनी केली आहे. त्यापुढे आता "सर्किट" या चित्रपटाद्वारे तो आता चित्रपट दिग्दर्शनात पाऊल टाकत आहेत.

अभिनेता रमेश परदेशी याची देखील या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आपल्याला पहायला मिळणार आहे. रोमान्स आणि अॅक्शनचा मिलाफ "सर्किट" या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाची पटकथा आणि संवाद संजय जामखंडी यांची आहे. सिनेमॅटोग्राफर म्हणून शब्बीर नाईक यांनी काम पाहिले असून संकलन दिनेश पुजारी यांचे आहे तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

येत्या ७ एप्रिलला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :Marathi Movies