अभिनेत्री हुमा कुरेशी एअरलाईन कंपनीवर भडकली, कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

huma qureshi

अभिनेत्री हुमा कुरेशी एअरलाईन कंपनीवर भडकली, कारण...

आपल्या हटके अभिनयासाठी प्रसिद्ध असणारी अभिनेत्री म्हणजे हुमा कुरेशी. actress huma qureshi तिनं बॉलीवूडमध्ये bollywood आपल्या दर्जेदार अभिनयानं वेगळा ठसा उमटविला आहे. ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणारी सेलिब्रेटी आहे. भवतालच्या राजकीय, सामाजिक परिस्थितीवर देखील ती आपली मतं बिनधानस्तपणे मतं मांडत असते. त्यामुळे तिला अनेकदा ट्रोलही troll व्हावं लागलं आहे. मात्र त्याचा तिच्यावर काही एक परिणाम झालेला नाही. आताही अभिनेत्री चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे तिची एका एअरलाईन कंपनीशी झालेला वाद.

सध्या हुमा कुरेशी चर्चेत आहे ती तिच्या बेल बॉटम bell bottom नावाच्या चित्रपटामुळे. या महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोरोनाच्या काळात अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला होता. फायनली ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यात हा चित्रपट रिलिज होणार आहे. लॉकडाऊननंतर थिएटरमध्ये प्रदर्शित होणारा हा पहिलाच चित्रपट असणार आहे. त्यात अक्षय कुमार akshay kumar आणि हुमा कुरेशी यांच्या प्रमुख भूमिका आहे. त्यातील हुमा कुरेशी तिच्या एका व्टिटमुळे चर्चेत आली आहे.

हेही वाचा: 'गोल्डन बॉय' नीरजला आपल्या बायोपिकमध्ये कोण हवंय?

हेही वाचा: 'बेल बॉटम'मधलं पहिलं गाणं व्हायरल, खिलाडीवर कौतुकाचा वर्षाव

त्याचं झालं असं की, रविवारी सकाळी हुमाची एका खासगी एअरलाईनची फ्लाईट होती. त्यासाठी ती पहाटेच साडेपाच वाजता एअरपोर्टला आली होती. मात्र तिथं तिला ती फ्लाईट मिळाली नाही. त्यामुळे तिनं सोशल मीडियावर त्याबाबत आपली नाराजीही व्यक्त केली. काय प्रकार घडला तिनं त्यात सांगितलं. तिनं लिहिलं होतं की, मी पहाटे साडेचार वाजता एअरपोर्टला आले. तिथं एका प्रायव्हेट कंपनीची विमानसेवा मी घेतली होती. तिकीट बूक केले होते. मात्र असे असतानाही साडेसहा वाजताच्या त्या फ्लाईटमध्ये मला जाता आले नाही.

त्यावर मला असे सांगण्यात आले की ती फ्लाईट ओव्हरबुक आहे. मात्र अशाप्रकारचे मँनेजमेंट जर असेल तर माझी दुसरी फ्लाईट पण मिस होणार नाही का, अशाप्रकारची प्रतिक्रिया अभिनेत्री हुमानं दिली आहे. मात्र त्यानंतर काही काळानं ते व्टिट हुमानं डिलिटही केलं. तिचा आगामी चित्रपट बेल बॉटम हा येत्या काही दिवसांत प्रदर्शित होणार आहे. नुकताच त्याचा ट्रेलरही प्रदर्शित झाला आहे.

Web Title: Huma Qureshi Deleted Tweet After Angry On Spicejet Flight For Not Board

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top