esakal | 'शपथ घेऊन सांगतो, मी अजूनही सिंगलच' मिजान असं का म्हणतोय?
sakal

बोलून बातमी शोधा

meezan jafari

'शपथ घेऊन सांगतो, मी अजूनही सिंगलच' मिजान असं का म्हणतोय?

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड सेलिब्रेटींबद्दल(bollywood celebrities) नेहमी कोणत्या कोणत्या विषयांवर चर्चा होत असते. त्यांचा सोशल मीडियावर बोलबाला असल्यानं त्यांच्या प्रत्येक हालचालींवर चाहत्यांचे लक्ष असते. अर्थात यात सगळेच सेलिब्रेटी हे चाहत्यांना काय वाटेल याचा विचार करत नाही. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही ट्रोलर्स करत असल्याचे दिसून आले आहे. जावेद जाफरी हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कोणेएकेकाळी चांगला डान्सर म्हणूनही तो प्रख्यात होता. होस्ट म्हणूनही त्यानं नाव कमावलं आहे. त्याचा मुलगा मिजान जाफरी यानं संजय लीला भन्साळीच्या मलाल (sanjay leela bhansali) या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये (malal movie) कमबॅक केलं होतं. (hungama 2 actor meezaan jaaferi opens up on rumours of dating navya naveli nanda says i am single yst88)

सध्या मिजान आणि अमिताभ बच्चन (amitabha bachchan) यांची नात नव्या नवेली नंदा (grand daughter) यांच्या रिलेशनबद्दल मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. मिजान (meezan) हा त्याच्या हंगामा 2 वरुन चर्चेत आला आहे. आपल्या पहिल्या चित्रपटामुळे तो चाहत्यांच्या पसंतीस पडला होता. आता तो सोशल मीडियावर जास्त प्रकाशझोतात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी अफवा आहे की मिजान आणि नव्या नवेली नंदा यांचे अफेयर आहे. यासगळया प्रकारामुळे नव्या नवेली नंदा चांगलीच भडकली आहे. त्यावर मिजाननं देखील प्रतिक्रिया दिली आहे.

मिजान हंगामा 2 मध्ये शिल्पा शेट्टी सोबत दिसणार आहे. त्यानं डीनएला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सांगितले की, मी अजून कुणाला डेट करण्यास सुरुवात केलेली नाही. मी माझी शपथ घेऊन सांगतो की, मी अजून सिंगल आहे. मी अनेकदा हे सांगितले आहे. मात्र त्यावर कुणीही विश्वास ठेवायला तयार नाही. मागे देखील मी काही सांगितले होते मात्र त्याच्यावर काही वेगळेच छापून आले होते.

हेही वाचा: मुंबईच्या रस्त्यावर गाडी चालवून दाखवा; सुमित राघवनचे चॅलेंज

हेही वाचा: 'वाघाचं काळीज पाहिजे'; चाहत्याच्या कमेंटवर अमृताचे उत्तर

मी जे बोललो त्यावरुन मोठ्या प्रमाणात हंगामा झाला आहे. हे मला माहिती आहे. मात्र लोकं नेहमी चूकीच्या पद्धतीनं तुमच्या बोलण्याचा अर्थ लावतात. त्याला आपण काय करायचं. त्यामुळे मी आता ठरवलं आहे की, कुणाशी काही बोलायचं नाही. ते जास्त सुरक्षित आहे असे मला वाटते. बराच गोंधळ झाला आहे. त्यामुळे आता बस्स. अशा शब्दांत मिजाननं आपला राग व्यक्त केला आहे. जे काही चाललं आहे ते नव्या नवेलीसाठी देखील त्रासदायक आहे.

loading image