सुशांतसाठी छायाचित्रकार बसणार उपोषणाला; गांधी जयंतीनिमित्त पुढाकार

Hunger Strike for Sushant Singh Rajput Death Case on Gandhi jayanti
Hunger Strike for Sushant Singh Rajput Death Case on Gandhi jayanti

मुंबई - सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाने वेगवेगळी वळणे घेतली आहेत. त्यात अनेकांना ड्रग्जच्या चौकशीसाठी एनसीबीकडून बोलावण्यात आले आहे. आता .या प्रकरणात बॉलीवूडच्या छायाचित्रकारांनी पुढाकार घेतला आहे.  सुशांतच्या मृत्यूला आता दोन महिने उलटून गेले आहेत. सीबीआय आणि एनसीबीच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सुशांतला लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी कोरिओग्राफर गणेश हिवारकर थेट उपोषणाला बसणार आहेत. गांधी जयंतीच्या निमित्ताने  उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असून त्यात नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.सुशांत आणि गणेशमध्ये यांची चांगली मैत्री होती. सुशांतच्या मृत्यूमुळे त्यांना मानसिक धक्का बसला होता.  या प्रकरणाच्या चौकशी तातडीने व्हावी यासाठी ते   उपोषण करणार आहे. “मी आणि अंकित गांधी आम्ही येत्या दोन ऑक्टोंबरला उपोषण करणार आहोत. आम्हाला या आंदोलनासाठी गांधीजींचा आशिर्वाद हवा आहे. त्यामुळे आम्ही इंदिरा गांधी विमानतळावरुन राजघाट पर्यंत पदयात्रा करणार आहोत. तुम्ही देखील या उपोषणात सहभागी व्हा.” अशा आशयाची इन्स्टाग्राम त्यांनी लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

आतापर्यत झालेल्या अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आलं आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाद्वारे या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.  त्यातुन सारा अली खान, रकुल प्रित सिंह, सिमोन खंबाटा, श्रद्धा कपूर, नम्रता शिरोडकर, दीपिका पदुकोण, दिया मिर्झा, अबिगल पांडे यांसारख्या अनेक नामांकित अभिनेत्रींची नावं समोर आली असून त्यांची चौकशी करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com