'तो जे बोलला त्यावर मी सहमत'; काम्या पंजाबीचा वीर दासला पाठींबा |Vir Das | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vir das
'तो जे बोलला त्यावर मी सहमत'; काम्या पंजाबीचा वीर दासला पाठींबा

'तो जे बोलला त्याच्याशी सहमत'; काम्या पंजाबीचा वीर दासला पाठींबा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘ टू इंडियन’ हा एकपात्री प्रयोग अपलोड केला होता. वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. त्यातील वक्तव्यामुळे वीर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लोक वीर दासवर भारताचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. वीर हा सध्या अमेरिकेत आहे. वीरने त्याबद्दल जरी माफी मागितली असली तरी देखील सोशल मीडियावर अनेकांनी देशाचा अपमान केल्याचं म्हटलं आहे, तर काही नेटकऱ्यांनी त्याला पाठिंबाही दर्शवला आहे. पण कलाकारांमध्ये आता अभिनेत्री काम्या पंजाबी वीरला पाठिंबा देत पुढे आली आहे.

काम्याचा व्हिडीओ हा सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये काम्या म्हणते,“तो जे काही बोलला त्यावर मी अगदीच सहमत आहे, भारताच्या दोन बाजू आहेत. एक अशी बाजू आहे ज्यावर आम्हाला खरचं गर्व आहे, आणि त्यासाठी आम्ही जीव द्यायला देखील तयार आहोत आणि दुसरी बाजू अशी आहे ज्यात बदल होणं गरजेचं आहे, अशी मी करते. त्यामुळे तो जे बोलला, त्यात काय चुकीचं आहे?”

हेही वाचा: 'गप्प बस, तुझे मत तुझ्या पुस्तकापेक्षाही वाईट'; चेतन भगत ट्रोल

वीर दासच्या या संपूर्ण व्हिडिओ मधील एक क्लिप ट्विटरवर प्रचंड व्हायरल होत आहे. ही क्लिप पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं होतं. “मी अशा भारतातून आलो आहे, जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री त्यांच्यावर बलात्कार होतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे हवा गुणवत्ता निर्देशांक ९००० आहे तरीही आम्ही आमच्या छतावर झोपतो आणि रात्री तारे पाहतो. मी अशा भारतातून आलो आहे जिथे आम्हाला शाकाहारी असण्याचा अभिमान वाटतो आणि तरीही आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकर्‍यांवर धावून जातो,” असं वीर त्या व्हायरल झालेल्या व्हिडीओत बोलताना दिसतो.

loading image
go to top