'गप्प बस, तुझे मत तुझ्या पुस्तकापेक्षाही वाईट'; चेतन भगत ट्रोल Chetan Bhagat | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chetan Bhagat and Vir Das
'गप्प बस, तुझे मत तुझ्या पुस्तकापेक्षाही वाईट'; चेतन भगत ट्रोल

'गप्प बस, तुझे मत तुझ्या पुस्तकापेक्षाही वाईट'; चेतन भगत ट्रोल

प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन वीर दासने त्याच्या यूट्यूब चॅनलवर ‘टू इंडियनज’ हा एकपात्री प्रयोग अपलोड केला आहे. अलीकडेच वॉशिंग्टन डीसी मधील जॉन एफ केनेडी सेंटरमध्ये त्याच्या सादरीकरणाचा हा व्हिडिओ होता. सहा मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये, वीरने देशाच्या दुहेरी चारित्र्याबद्दल भाष्य केल्याचं तसेच कोविड महामारी, बलात्काराच्या घटना आणि विनोदी कलाकारांवरील कारवाई ते शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला. त्याची बोलण्याची शैली जरी लोकांना आवडली असली तरी आता त्याला विरोध केला जात आहे. अनेकांनी वीर दासवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा आरोप केला आहे. आता यातच प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांनी देखील अप्रत्यक्षपणे वीर दासवर निशाणा साधला आहे.

'मी माझ्या आईशी भांडू शकतो किंवा तिच्यात अनेक दोष शोधू शकतो, पण शेजाऱ्याच्या घरी जाऊन मी तिच्यावर टीका करणार नाही. मला माझ्या देशात शंभर गोष्टी चुकीच्या वाटतील पण मी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाहीरपणे माझ्या देशावर टीका करणार नाही. कदाचित असं फक्त मीच करत असेन, परंतु अशा काही गोष्टी नको व्हायला,” असं चेतन भगत यांनी ट्विट करत म्हटलं आहे. पण त्याच्या या ट्विटवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे.

हेही वाचा: 'हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून..' समीर विद्वांसचं ट्विट चर्चेत

नीरज घायवानने चेतन भगतला रिप्लाय देत म्हटलं, 'जेव्हा तुमच्याकडे अपमान करणारे पालक असतील, पण ते बोलतात ते तुमच्या फायद्यासाठीच आहे,असा विश्वास ठेवता, तेव्हा इतरांची मदत घेणं हा एकमेव उपाय उरतो.' तर एकाने लिहिलं, 'तुझं हे विधान तुझ्या पुस्तकांपेक्षा वाईट आहे.' तर दुसऱ्या युर्जरने लिहिलं,'हो,तो निश्चितपणे फक्त तू आहेस. जर माझे वडील माझ्या आईला मारहाण करत असतील आणि त्याचे वडील प्रोत्साहन देत असतील तर मी नक्कीच माझ्या शेजाऱ्याकडे जाईन.त्यामुळे तूच मूर्ख आहेस.'

मंगळवारी, वीरने एक निवेदन जारी करून स्पष्ट केलं की ‘ टू इंडियनज’ या एकपात्री नाटकातून त्याला देशाचा अपमान करण्याचा हेतू नव्हता. दासच्या या धाडसी कृत्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे,ट्विटरवरील एका विभागाने त्याच्या एकपात्री नाटकातील क्लिप आणि फोटो पोस्ट केलं आहेत, विशेषत: तो भाग जिथे कॉमेडियन म्हणाला, "मी अशा देशातून आलो आहे, जिथे आम्ही दिवसा महिलांची पूजा करतो आणि रात्री त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतो."

loading image
go to top