esakal | 'या' मराठमोळ्या कलाकारांचा फॅन आहे अभिनेता अमेय वाघ
sakal

बोलून बातमी शोधा

amey wagh

अनेकांचा हिरो असलेल्या अमेयला मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकार हिरो वाटतात. त्या कलाकारांचा तो फॅन असल्याचं त्याने स्वतः कबुल केलंय. 

'या' मराठमोळ्या कलाकारांचा फॅन आहे अभिनेता अमेय वाघ

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई-  'दिल दोस्ती दुनियादारी' मधील कैवल्य म्हणजेच अभिनेता अमेय वाघचे अनेक चाहते आहे. सिनेमा असो, नाटक असो किंवा मग सोशल मिडिया, अमेय त्याच्या चाहत्यांना वेगवेगळ्या माध्यमातून भेटत असतो. मात्र अनेकांचा हिरो असलेल्या अमेयला मराठी सिनेसृष्टीतील दोन कलाकार हिरो वाटतात. त्या कलाकारांचा तो फॅन असल्याचं त्याने स्वतः कबुल केलंय. 

हे ही वाचा:  ‘कट्यार..’ सिनेमाला ५ वर्ष पूर्ण, ‘सुरांशी जुळलेलं नात आजही कायम' सुबोधची खास पोस्ट

उत्तम अभिनय शैली, हजरजबाबीपणा, योग्य कथानकांची निवड यामुळे अमेयचा चाहतावर्ग चांगलाच मोठा आहे. लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अमेय मराठी सिनेसृष्टीतील दोन कलकारांचा मोठा फॅन असल्याचं खुद्द अमेयनेच सांगितलंय.

सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर स्टारर ‘कलरफुल’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या सिनेमाचं पोस्टर शेअर करत सिनेमाची घोषणा करण्यात आली. सईने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाचं पोस्टर शेअर केलंय. त्यावर अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अमेयने सई आणि ललित अशा दोन्ही कलाकारांसोबत काम केलंय तेव्हा तिच्या या पोस्टवर अमेय वाघने कमेंट करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय. अमेयने कमेंट करत ‘मी या दोन्ही कलाकरांचा फॅन आहे. हा सिनेमा तिकिट काढून थिएटरमध्ये बघणार’ अशी कमेंट त्याने केली आहे. अमेयची ही कमेंट सध्या चर्चेचा विषय बनलीये. यासोबतंच सई आणि ललितच्या या आगामी सिनेमाची देखील प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

i am a big fan of sai tamhankar and lalit prabhakar says actor ameya wagh  

loading image