चार वर्षांपासून मी नैराश्यातच; मिस्टर परफेक्शनिस्ट खानची मुलगी इरा सांगते 

I am clinically depressed confesses Aamir Khan daughter Ira Khan 
I am clinically depressed confesses Aamir Khan daughter Ira Khan 

मुंबई- बॉलीवूडमध्ये मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून प्रसिध्द असणा-या आमीर खान याच्या मुलीने सोशल मीडियावर व्हायरल केलेल्या एका माहितीमुळे वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. मी चार वर्षांपासून नैराश्यात असल्याचे इरा खानने म्हटले आहे. अशावेळी आपल्य़ा परफेक्शनसाठी ओळखलेल्या जाणा-या आमीर खानवर नेटक-यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

अभिनेता आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर सतत अॅक्टिव्ह असते. तिची अद्याप बॉलीवूडमध्ये इन्ट्री घेतलेली झालेली नाही. तिची फॅन फॉलोइंग मात्र  कुठल्याही सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही.  तिने ‘जागतिक मानसिक स्वास्थ्य दिना’च्या (World Mental Health Day) निमित्ताने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने आपल्या चाहत्यांना मानसिक स्वास्थ्याचं महत्व समजावून सांगितलं आहे. इन्स्टाग्राम व्हिडीओ पोस्ट करुन इराने मानसिक स्वास्थ्याचं महत्व समजावून सांगितलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. आपल्या व्हिडीओची सुरुवात करताना ती म्हणते, मला आता नैराश्याने ग्रासले आहे. त्याला चार वर्षे होतील. यासंबंधी मी डॉक्टरांचा सल्ला घेतला आहे. त्यांनी मला मी क्लिनिकल डिप्रेशनमध्ये असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून घेत असलेल्या सल्ल्यानुसार मी आता बरीही होत आहे.

मला माझे मानसिक आरोग्य दूर करण्यासाठी काही करावे लागणार आहे. पण काय हे अजून नेमकं मला ठाऊक नसल्याचेही इराने म्हटले आहे. पुढे ती म्हणते, यासगळ्या परिस्थितीवर काय बोलावे हे कळत नाही. नैराश्यात असलेल्या लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे. पण काय करायचं ते अद्याप मी निश्चित केलेलं नाही. असो, पण तुम्ही आपल्या मानसिक स्वास्थ्याकडे दुर्लक्ष करु नका. शरीरासोबतच मनाला देखील तंदुरुस्त करण्यासाठी काम करा.” असे ती म्हणते.लॉकडाऊनच्या काळात इराने स्व;तला फार बिझी करुन घेतले होते. दरम्यान ती टॅटू आर्टिस्ट म्हणून काम करत असल्याचे तिने सांगितले. त्यासंबंधीचे अनेक व्हिडिओही तिने आपल्या सोशल अकाऊंटवरुन शेयर केले आहेत. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com