esakal | माझ्याकडे शब्द नाहीत, काय बोलावे हे सुचत नाही- अभिनेते मनोज जोशी
sakal

बोलून बातमी शोधा

 माझ्याकडे शब्द नाहीत, काय बोलावे हे सुचत नाही- अभिनेते मनोज जोशी

सुशांत सिंह याच्या आत्महत्येमुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचा

माझ्याकडे शब्द नाहीत, काय बोलावे हे सुचत नाही- अभिनेते मनोज जोशी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सुशांत सिंह याच्या आत्महत्येमुळे चित्रपट सृष्टीतील अनेक कलाकारांना धक्का बसला आहे. जेष्ठ अभिनेते मनोज जोशी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. वाचा

सुशांतचे चित्रपट प्रेरणादायी होते. छिछोरे या चित्रपटाद्वारे त्याने आत्महत्या करू नका...आपले सुंदर जीवन संपवू नका, असा संदेश दिला. त्याचे करिअर एका चांगल्या टप्प्यावर होते. करिअरने चांगला वेगही घेतला होता. चांगली दिशा मिळाली होती. पुढील वर्षी दोन-तीन चित्रपट प्रदर्शित होणार होते. शिवाय तो सुशिक्षित आणि सुजाण होता. जीवन आनंदी जगणारा होता. तो बिहारमधील छोट्याशा गावातून येथे आला आणि स्ट्रगल करून जम बसवू लागला. वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी त्याने आपले जीवन संपविले. एवढा मोठा निर्णय त्याने घेतला.

Live Update : सुशांतसिहवर विलेपार्ले स्मशानभूमीत होणार अंत्यसंस्कार
 

हे सगळे मन अस्वस्थ करणारे आहे. त्याने आत्महत्या का केली वगैरे गोष्टींचा तपास पोलिस करतीलच. चित्रपटसृष्टीवर हा मोठा आघात आहे. चित्रपटसृष्टी एकापाठोपाठ एक मोहरे गमावीत आहे. एवढ्या कमी वयात सुशांतने या जगाचा निरोप घेतला ही घटना मनाला चटका लावणारी आहे. सध्चा कोरोनासारख्या नकारात्मक वातावरणात एकमेकांनी एकमेकाला सहकार्य करण्याची तसेच सांभाळण्याची आवश्यकता आहे. कारण अशा काळात नकारात्मक विचार मनात येण्याची शक्यता असते. त्त्यावेळी मित्रमैत्रिणींनी एकमेकाला सहकार्य करण्याची गरज आहे. कारण आपल्या जीवनात चढ उतार असतात. अशा वेळी आपला हौसला व आत्मविश्वास बुलंद ठेवण्याची आवश्यकता आहे. सुशांतने आपल्या चित्रपटाद्वारे चांगला संदेश दिला...प्रेरणादायी चित्रपट त्याने केले आणि त्यानेच असे कृत्य करावे....खरोखर मन सुन्न करणारी घटना आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी देवाला विनंती करतो की आमच्यातील नकारात्मकता संपव आणि सकारात्मक विचार करण्याची शक्ती आम्हाला दे.