esakal | उदय चोप्रासोबतच्या नात्यावर अभिनेत्री नर्गिस फाखरीचा खुलासा
sakal

बोलून बातमी शोधा

Uday Chopra and Nargis Fakhri's secret affair

उदय चोप्रासोबतच्या नात्यावर अभिनेत्री नर्गिस फाखरीचा खुलासा

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: रॉकस्टार, (Rock star) मद्रास कॅफे सारख्या चित्रपटांमधून आपली वेगळी छाप उमटवणारी अभिनेत्री नर्गिस फाखरीने (nargis fakhri) प्रथमच उदय चोप्रा सोबतच्या आपल्या नात्यावर भाष्य केले आहे. उदय चोप्रा (uday chopra) दिवंगत चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा (yash chopra) यांचा मुलगा आहे. "उदय आणि मी पाच वर्ष रिलेशनशिपमध्ये होतो. मला भारतात भेटलेला तो सर्वात सुंदर माणूस होता" असे नर्गिसने इटी टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

नर्गिस फाखरी आणि उदय चोप्रा आता रिलेशनशिपमध्ये नाहीत. त्यांचा ब्रेक अप झाला आहे. उदय चोप्रासोबत डेटिंग करत असताना त्या नात्याबद्दल कधीच कुठे का बोलले नाही? जगापासून हे नातं लपवून का ठेवलं? या बद्दल ४१ वर्षीय नर्गिसने खुलासा केला आहे. "रिलेशनशिपबद्दल कुठे काही बोलू नकोस, असा मला लोकांनी सल्ला दिला होता. त्यामुळे मी प्रेसजवळ कधीही आमच्या नात्याची कबुली दिली नाही. पण आज मला त्याची खंत वाटते. मी डोंगरावर उभं राहून, मी एका सुंदर माणसासोबत नात्यामध्ये आहे, हे ओरडून सांगायला हवं होतं" असं नर्गिसने म्हटलं आहे.

हेही वाचा: मुंबई: कोलगेट समजून उंदीर मारण्याच्या पेस्टने ब्रश, मुलीचा मृत्यू

लोकांनी दिलेल्या सल्ल्यामुळे नर्गिसने कधीही तिच्या प्रेमाची जाहीर कबुली दिली नाही. सोशल मीडियाबद्दलही नर्गिसने तिचं मत मांडलं आहे. "इंटरनेट आणि सोशल मीडिया बनावट आहे. तिथे असणाऱ्या लोकांना सत्य माहित नसतं. आपण काही जणांना आदर्श मानतो पण पडद्यामागे ते खूप वाईट असतात" असं नर्गिसने सांगितलं.

loading image
go to top