'हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून..' समीर विद्वांसचं ट्विट चर्चेत

समीर विद्वांसने अनेक दर्चेदार चित्रपट केले आहेत.
Sameer Vidhwans
Sameer Vidhwansinstagram

मराठी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण करणारा दिग्दर्शक म्हणजे समीर विद्वांस. त्याने आजवर अनेक दर्जेदार चित्रपट केले आहेत. त्याने मराठीबरोबरच बॉलीवूडमध्ये देखील आपल्या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिकंली आहे. समीर हा सोशल मीडियावर देखील सक्रिय असतो. नुकतचं त्याने केलेल्या ट्वीटची चांगलीच चर्चा होत आहे. हे ट्विट त्याने प्रेक्षकांसाठी लिहिलं असून त्यामध्ये त्याने प्रेक्षकांना विनंती केली आहे.

काय आहे समीर विद्वांसचं ट्विट;

समीरने ट्वीट करत प्रेक्षकांना चित्रपट हा चित्रपटगृहांमध्ये जावून पाहण्याची विनंती केली आहे. 'हे मनापासून बोलावसं वाटलं म्हणून.. सगळ्यांच्यावतीने.. सगळ्यांसाठी..’ असं ट्विट करत त्याने पुढे लिहिलं,

‘गेले दीड वर्षे सगळ्यांसाठीच आर्थिक गणित कोलमडून टाकणारं गेलंय, अजूनही जातंय. मनोरंजन क्षेत्रही यातून सुटलं नाही. लाखो कुटुंब पोळली गेली, काही अजूनही झगडतायत. करोडोची गुंतवणूक २ वर्षे अडकून आहे. त्यावर अनेकांचे भवितव्य अवलंबून आहे आणि आत्ता कुठे गाडी यार्डातून बाहेर येत आहे. पण ती नीट रुळावर आणणं पूर्णपणे आता प्रेक्षकांच्या हातात आहे. एकीकडे हिंदीचे १५० कोटी पार आकडे बघताना मनापासून वाटतं की असाच भरघोस हाऊसफूल प्रतिसाद मराठी चित्रपटांनाही मिळावा! ते चित्र बघायला आणि अनुभव घ्यायला आम्ही सर्व कलाकार मंडळी आसूसलोय! पण खरंच! पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा मराठी चित्रपटही प्रेक्षक चित्रपट गृहात जाऊन पाहतील. तसं घडलं तर ते तुफान हाऊसफूल दिवस दूर नाहीत. खरच सांगतो आमच्या कलाकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की येणारे मराठी चित्रपट शक्य तितके चित्रपटगृहात जाऊनच बघा. नाही आवडले तर तसं मोकळेपणाने सांगाच, तो तुमचा हक्कंच आहे.

Sameer Vidhwans
कंगनाच्या 'भीक' या विधानावर जावेद अख्तर उखडले, म्हणाले...

पण तुम्ही जर भरभरुन प्रतिसाद दिलात तर आणि तरच आपली मराठी चित्रपटसृष्टी परत एकदा हळूहळू रांगायला.. चालायला आणि मग धावायला लागेल. याच बरोबर राज्यसरकारलाही विनंती आहे. बाकी सगळं अगदी नीट व्यवस्थीत सुरु झालंय तर मग चित्रपट आणि नाट्यगृहही पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर सुरु करण्यात यावीत.’ असं ट्विट समीरने केलं आहे. समीरच्या 'मिमी' या हिंदी चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता लवकरच त्याचा 'सत्यनारायण की कथा' हा चित्रपटाची शूटिंग सुरु होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com