कंगनाच्या 'भीक' या विधानावर जावेद अख्तर यांनी दिलं उत्तर | Kangana Ranaut | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Javed Akhtar and Kangana Ranaut'
कंगनाच्या 'भीक' या विधानावर जावेद अख्तर उखडले, म्हणाले...

कंगनाच्या 'भीक' या विधानावर जावेद अख्तर उखडले, म्हणाले...

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बॉलिवूड क्वीन कंगना रनौत ही नेहमी तिच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते.नुकतचं एका परिषेदमध्ये कंगना रणौत म्हणाली की, भारताचे स्वातंत्र्य म्हणजे 'भीक' (हँडआउट) आहे. कंगनाच्या या विधानावर बॉलिवूडमधील अनेकांनी तसेच राजकीय नेत्यांनी देखील तिची निंदा केली होती. त्याचप्रमाणे तिच्याविरुद्ध पोलिसांत तक्रारही दाखल झाल्या आहेत. आता यावर गीतकार जावेद अख्तर यांनी गुरुवारी अभिनेत्री कंगना रनौतच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया मांडली आहे.

जावेद अख्तर यांनी ट्विटरवर लिहिलं, 'ज्यांचा भारताच्या स्वातंत्र्य चळवळीशी काहीच संबंध नव्हता, असे लोक आपल्या स्वातंत्र्याला भीक म्हणत असतील तर का वाईट वाटेल, म्हणून हे मी पूर्णपणे समजू शकतो.' पद्मश्री पुरस्कार विजेती कंगनाने यापूर्वी टाईम्स नाऊच्या परिषदेत म्हणाली होती, "...रक्त वाहतयं.पण ते नक्कीच हिंदुस्थानी रक्त नसावं. त्यांना ते माहिती आहे आणि त्यांनी त्याची किंमत देखील मोजली. अर्थात ते स्वातंत्र्य नव्हते तर भीक होती, आणि खरं स्वातंत्र्य तर आम्हाला २०१४मध्ये मिळालं आहे.

तिच्या या विधानानंतर भाजप खासदार वरुण गांधी यांनी कंगनाचा हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट करत म्हणाले , "हे देशद्रोही कृत्य आहे आणि त्याला तसंच पुकारलं पाहिजे. आणि असं न करणं म्हणजे रक्त सांडणार्‍यांचा विश्वासघात होईल, कारण त्यांच्यामुळे आज आपण एक राष्ट्र म्हणून उंच आणि स्वतंत्र उभे राहू शकू." अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विटरवर एक व्हिडिओ क्लिप पोस्ट करत म्हटलं, "टाळ्या वाजवणारे मूर्ख कोण आहेत ते मला जाणून घ्यायचं आहे." यावर चित्रपट निर्माते ओनीर यांनीही विचारलं, "आम्ही आता नवीन स्वातंत्र्यदिन साजरा करू का?"

हेही वाचा: सपना चौधरीविरोधात अटक वॉरंट जारी; जाणून घ्या नेमकं प्रकरण

कंगनाच्या ‘टिकू वेड्स शेरू’ या नव्या चित्रपटाची शूटिंग सुरु झाली आहे. साई कबीर दिग्दर्शित या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर हे प्रमुख भूमिकेत आहे. तर कंगना ही धाकड, तेजस, मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा, इमर्जन्सी, अपराजिता अयोध्या आणि सीता यांसारख्या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

loading image
go to top