लॉकडाऊननंतर अभिनेत्री दिशा पटानीने 'ही' गोष्ट करण्याची व्यक्त केली इच्छा..

disha
disha

मुंबई - अभिनेत्री दिशा पटानीने तेलुगू चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं अन् तिला अल्पावधीतच चांगली लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ती काही ना काही कारणास्तव चर्चत राहिली. चित्रपटांपेक्षा तिच्या अन्य बातम्यांची चर्चा अधिक रंगली. अभिनेता टायगर श्राॅफबरोबरची तिची मैत्री हिंदी चित्रपटसृष्टीसह अन्य ठिकाणी बरीच रंगली. मात्र एक गोष्ट खरी की तिला बॉलिवूडमधील बिग स्टार्सबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दिशानेही प्रत्येक वेळी तिला मिळालेल्या सुवर्ण संधीचं सोनं केलं. 'भारत', 'बागी 2', 'मलंग' यांसारख्या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या. 

विशेष म्हणजे 'मलंग'मधील बोल्ड सीन्स तिने बिनधास्त दिले आणि त्याचीही खमंग चर्चा रंगली. पण तिने त्याची काही पर्वा केली नाही. जे करायचे आहे ते बिनधास्त आणि धडाक्यात असाच तिचा खाक्या. मग तो हिंदी चित्रपट असो की साऊथमधील चित्रपट असो. दिशाला एखादी स्क्रीप्ट आवडली की तो चित्रपट ती स्वीकारते. सतत काही तरी ती नवीन करण्याची इच्छा बाळगते. कारण कुणीही गाॅडफादर नसताना येथपर्यंत मजल तिने मारली हे काही कमी नाही आणि तिला मोठी मजल मारायची आहे. त्याकरिता सातत्याने काही तरी नावीन्यपूर्ण करायची तिची इच्छा आहे. आता म्हणे तिला एखाद्या चांगल्या ऍक्शनपटाचे वेड लागले आहे. खरे तर तिने 'बागी २' या ऍक्शनपटात काम केले आणि तिच्या कामाचे कौतुक झाले.पण महिलाप्रधान ऍक्शनपट करण्याची आता तिची इच्छा आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#beyonce Choreography #brian #quarantinelife

A post shared by disha patani (paatni) (@dishapatani) on

दिशा म्हणते, मला माझ्या भूमिकांबाबत नवनवीन प्रयोग करण्यास आवडतात. यापुढे मला एका धमाकेदार अॅक्शनपट चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे.` सध्यातरी दिशाकडे सलमान खान स्टारर राधे चित्रपट आहे. हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आङे. खरे तर हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे काहीच सांगता येत नाही. चित्रपटगृह सुरू झाल्यानंतरच राधेचे काय ते ठरणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com