भारतीय थिएटर विश्वात क्रांती घडविणारे इब्राहीम अल्काझी यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारतीय थिएटर विश्वात क्रांती घडविणारे इब्राहीम अल्काझी यांचे निधन

भारतीय थिएटर विश्वात क्रांती घडविणारे इब्राहीम अल्काझी यांचे आज दुपारी दिल्ली येथील एका रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

भारतीय थिएटर विश्वात क्रांती घडविणारे इब्राहीम अल्काझी यांचे निधन


मुंबई  ः भारतीय थिएटर विश्वात क्रांती घडविणारे इब्राहीम अल्काझी यांचे आज दुपारी दिल्ली येथील एका रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 94 वर्षांचे होते.  इब्राहीम अल्काझी यांना काल अस्वस्थ वाटू लागल्याने दिल्लीतील एस्कार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, आज दुपारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे संचालक असताना आधुनिक भारतीय रंगमंचाच्या अभ्यासक्रमाला वेगळे वळण देण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. 

मोदींवर गोध्रा, शहांवर सोहारुबुद्दीन-लोहिया खटल्याचे आरोप; आदित्य ठाकरेंची इमेज खराब करण्याचा प्रयत्न

अरबी घरात जन्मलेल्या अल्काझी यांना अरबीसह विविध भाषा अवगत होत्या. 1947 च्या फाळणीवेळी त्यांच्या कुटुंबातील काही जण पाकिस्तानला गेले. मात्र, अल्काझी यांनी भारतात राहणे पसंत केले. त्यांचे बालपण पुण्यात गेले. मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. त्या सुमारास त्यांनी सुलतान “बॉबी” पद्मसीच्या थिएटर गृप कंपनीत प्रवेश घेतला. 1940 च्या दशकाच्या उत्तरार्धात ते कलेत शिक्षण घेण्यासाठी लंडनला गेले आणि  रॉयल अॅकॅडमी ऑफ ड्रामा आर्ट्समध्ये रुजू झाले. त्यानंतर पुढील 15 वर्ष  त्यांनी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा (एनएसडी) चे संचालक म्हणून काम केले. 

एनएसडीमध्ये असताना त्यांनी कलाकारांच्या अनेक पिढ्या घडविल्या. अभिनेते नसीरुद्दीन शाह आणि ओम पुरी हे कलाकार त्यांच्याच तालमीत तयार झाले. मुंबईमध्ये असताना त्यांनी  शेक्सपियर, हेन्रिक इब्सेन, चेकोव्ह आणि ऑगस्ट स्ट्राइंडबर्ग यांच्या संहिता प्रभावीपणे इंग्रजीमध्ये मांडल्या. वयाच्या 50 व्या वर्षी अल्काझी यांनी एनएसडी आणि थिएटर सोडले आणि नवी दिल्ली येथे आपल्या पत्नीसमवेत आर्ट हेरिटेज गॅलरीची स्थापना केली आणि कला, छायाचित्रे आणि पुस्तके यांचा संग्रह तयार केला.

------------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

loading image
go to top