esakal | कोरोनाची परिस्थिती सुधारली की, पुढील उपचारांसाठी परदेशात जाणार :  मान्यता दत्त
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाची परिस्थिती सुधारली की, पुढील उपचारांसाठी परदेशात जाणार :  मान्यता दत्त

संजय दत्त आता मुंबईतच उपचार घेणार आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील उपचारासाठी आम्ही परदेशात जाणार आहोत अशी माहिती संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने दिली.

कोरोनाची परिस्थिती सुधारली की, पुढील उपचारांसाठी परदेशात जाणार :  मान्यता दत्त

sakal_logo
By
संतोष भिंगार्डे


मुंबई ः संजय दत्त आता मुंबईतच उपचार घेणार आहे. कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर पुढील उपचारासाठी आम्ही परदेशात जाणार आहोत अशी माहिती संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तने दिली. तिने पुढे असेही म्हटले की संजूने त्याच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिलेले आहेत. पण तुमच्या प्रेमाने त्याला प्रत्येक कठीण काळात खूप धैर्य दिले. याबद्दल आम्ही नेहमीच तुमचे आभारी आहोत. मी संजूच्या सर्व चाहत्यांचे व हितचिंतकांचे आभार मानते.

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणः सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येताच भाजप नेते ट्विटरवर अॅक्टिव्ह, निर्णयाचं 'असं' केलं स्वागत

अभिनेता संजय दत्तला चौथ्या स्टेजमधील फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे. त्यामुळे तो पुढील उपचारासाठी परदेशात जाणार होता. काल रात्री त्याला अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर आज त्याची पत्नी मान्यताने आपले स्टेटमेंज जाहीर केले. मान्यता म्हणते, की सध्या संजू कोकिलाबेन रुग्णालयात उपचार घेत असून त्याच्यावर सर्वोत्तम डॉक्टर उपचार करत आहेत. मी आजारपणाबद्दल प्रत्येकाला हात जोडून विनंती करते की त्याच्या आजारपणाबद्दल कोणत्याही प्रकारचे अंदाज लावणे आणि अफवा पसरवणे थांबवावे आणि डॉक्टरांना त्यांचे कार्य करू द्यावे. आम्ही आपल्याला त्यांच्या आरोग्याबद्दल सतत माहिती देत राहू." 

-------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे