तू बोल्ड सीन्सबद्दल प्रियकराला आधी सांगतेस का? तापसी म्हणाली... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तापसी पन्नू

तू बोल्ड सीन्सबद्दल प्रियकराला आधी सांगतेस का? तापसी म्हणाली...

मुंबई: अभिनयाच्या बरोबरीनेच सामाजिक विषयांवर परखड भाष्य करण्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे (Taapsee Pannu) तापसी पन्नू. येत्या शुक्रवारी तापसी पन्नूचा 'हसीन दिलरुबा' (Haseen Dillruba) हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तापसीसोबत विक्रांत मेस्सी (Vikrant Massey) आणि हर्षवर्धन राणे (Harshvardhan Rane) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात तापसीची काही बोल्ड दृश्य आहेत. (if she informs her real life partner about such scenes in advance Taapsee Pannu reaction)

"माझ्यासोबत हे बोल्ड सीन्स शूट करताना विक्रांत आणि हर्षवर्धन दोघांना भीती वाटत होती" असे तापसीने सांगितले. "माझी प्रतिमा किंवा दुसऱ्या काही प्रॉब्लेममुळे माझ्यासोबत बोल्ड दृश्य चित्रीत करताना विक्रांत आणि हर्षवर्धनच्या मनात एकप्रकारची भीतीची भावना होती" असे तापसी म्हणाली. दोघेही सहकलाकार बोल्ड दृश्य चित्रीत करताना अस्वस्थ आहेत, हे जाणवल्यानंतर तापसी या विषयावर दिग्दर्शक विनील मॅथ्यु यांच्याबरोबर बोलली.

हेही वाचा: हळवा कोपरा! राज ठाकरे अन् जेम्सचे काही दुर्मिळ फोटो

या अशा बोल्ड दृश्यांची, तू तुझ्या खऱ्या आयुष्यातील जोडीदाराला कल्पना देतेस का? या प्रश्नावर ती म्हणाली की, "नाही, मी माझ्या जोडीदाराला अशा प्रणय दृश्यांबद्दल सांगत नाही. मी माझं व्यावसायिक आयुष्य आणि खासगी जीवन पूर्णपणे वेगळं ठेवते. जोडीदाराने त्याच्या व्यावसायिक आयुष्यातील गोष्टीसाठी माझी परवानगी घ्यावी, अशी माझी अपेक्षा नाही."

हेही वाचा: 'तुम्हीच सांगा आम्ही कसं काम करायचं?' मुंबईतील व्यापाऱ्यांचा संताप

'हसीन दिलरुबा' हा विक्रांतचा नेटफ्लिक्सवर रिलीज होणारा चौथा चित्रपट आहे. कार्गो, डॉली किट्टी और वो चमकते सितारे, गिन्नी वेडस सन्नी हे विक्रांतचे तीन चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाले आहेत.

loading image
go to top