
हिरॉइन म्हणून चिडवणाऱ्याला टायगरने केलं गप्प
बॉलिवूडमधील अभिनेता टागयर श्रॉफ (tiger shroff) त्याच्या फिटनेसमुळे नेहमी चर्चेत असतो. टायगरने नुकतीच अरबाज खानच्या (Arbaaz Khan) 'पिंच' (pinch) या प्रसिद्ध शोमध्ये हजेरी लावली. पिंच या शोच्या एपिसोडचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमध्ये असे दिसत आहे की, आरबाज टायगरला ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट्स वाचून दाखवत आहे. या कमेंट्सला टागायगरने दिलेल्या सडोतोड उत्तरांनी सर्वांचे लक्ष वेधले.
'पिंच' या शोमध्ये अरबाजने टायगरला ट्रोल करणाऱ्यांच्या कमेंट वाचल्या. त्यापैकी एक कमेंट अशी होता की, 'तुमच्याकडे सर्वकाही आहे पण दाढी नाहीये' त्यावर टायगरने स्वत:ची दाढी कुरवाळत उत्तर दिले, 'तर मग हे काय आहे?'. टायगरने त्याला करिअरच्या सुरूवातीला लोक कसे चिडवत होते त्याबद्दल देखील या शोमध्ये सांगितले. टायगर म्हणाला, 'माझा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी माझ्या दिसण्यावरून लोक मला खूप ट्रोल काही लोक मला म्हणत होते, 'हा हिरो आहे की हिरॉइन? हा त्याच्या वडिलांसारखा(जॅकी श्रॉफ) अजिबात दिसत नाही.''
ट्रोलिंगबद्दल टायगरने मांडले मत
पिंच या शोमध्ये टायगरने ट्रोलिंगवर मत मांडले. तो म्हणाला, 'जर तुम्हाला लोक ट्रोल करत असतील तर त्याचे कारण हे असू शकते की तुम्ही काही तरी चांगले करत आहात. मी आज अभिनय क्षेत्रामध्ये जे काही काम करत आहे ते फक्त प्रेक्षकांमुळे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनामध्ये स्थान निर्माण करणे हेच माझ्यासाठी महत्वाचे आहे. बाकी गोष्टींकडे मी लक्ष देत नाही. '
टायगरने 'हिरोपंती' या चित्रपटामधून अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील अभिनेत्री क्रिती सनॉन आणि टायगरच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. टायगर बॉलिवूडमधील फिटनेस फ्रिक अभिनेता म्हणून ओळखला जातो. सध्या अभिनेत्री दिशा पटानीला टायगर डेट करत असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.
Web Title: In Arbaaz Khan Talk Show Pinch Tiger Shroff Reacts To Being Called Heroine
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..