Raj Thackeray: "मुंबई दर्शनच्या नावाखाली फक्त शाहरुख आणि अमिताभचे बंगले दाखवतात", राज ठाकरेंचं स्पष्ट मत

राज ठाकरेंनी मुंबईतल्या हेरीटेज ठिकाणांकडे बोट दाखवलं आहे
in the name of mumbai darshan people only see shahrukh salman amitabh bachchan bunglow raj thackeray
in the name of mumbai darshan people only see shahrukh salman amitabh bachchan bunglow raj thackeraySAKAL

प्रसिद्ध लेखक दीपक करंजीकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. जागतिक आर्किटेक्ट दिनाच्या निमित्तानं या मुलाखतीत राज यांनी चौफेर टोलेबाजी केली.

मुंबई - महाराष्ट्रात असलेल्या टाऊन प्लॅनिेंगबद्दल राज ठाकरेंनी भाष्य केलंय. कोणतंही प्लॅनिंग नसल्याने शहरांची कशी वाट लागलीय या गोष्टीकडे राज ठाकरेंनी बोट ठेवलंय.

(in the name of mumbai darshan people only see shahrukh salman amitabh bachchan bunglow raj thackeray)

in the name of mumbai darshan people only see shahrukh salman amitabh bachchan bunglow raj thackeray
Nitin Gadkari: कोणता आघाडीचा गायक आवडतो? नितीन गडकरींनी घेतलं या हिंदी गायकाचं नाव

राज ठाकरेंनी मुलाखतीत रामायणाचा उल्लेख केला. ज्या १२ वर्षात रामायण घडलं तेवढ्यात बांद्रा - वरळी सी लिंक उभारण्यात आलाय. हा आपल्या सरकारचा स्पीड. सगळंच चुकलंय. हायवेला जाताना जे ट्रक पहिल्या रांगेत चालत असतात तेच ट्रक तिसऱ्या रांगेत चालायला पाहिजे, पण तेही कोण सांगत नाही. काही काही सरकारी घरं बांधली जातात त्यात माणसं राहतात, की कबुतरं तेच कळत नाही.

राज ठाकरेंनी पुढे उदाहरण देत म्हटलं, "आजही समजा तुम्ही पुणे दर्शन असेल की मुंबई दर्शन असेल. मुंबई दर्शनचं मला माहितीय. आज जर तुम्ही मुंबई दर्शनच्या बसेस मध्ये गेलात तर एक राज्य सरकारचं काम म्हणून तारापोरवाला मत्स्यालय सोडलं तर सगळ्या ब्रिटीशकालीन गोष्टी त्या मुंबई दर्शनमध्ये दाखवल्या जातात. नवीन एकही गोष्ट नसते.

नवीनपैकी तारापोरवाला, शाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि सलमान खानचं घर हे त्या मुंबई दर्शनमध्ये येतं. नट म्हणून ते दाखवतात घर म्हणून नाही. पण ज्या वास्तू दाखवल्या जातात त्या ब्रिटीशकालीन आहेत."

in the name of mumbai darshan people only see shahrukh salman amitabh bachchan bunglow raj thackeray
Naal 2 Teaser: "मला लई राग आला होता", नाळ चित्रपटाचा टीझर पाहून जितेंद्र जोशीची प्रतिक्रिया चर्चेत

राज ठाकरे पुढे म्हणतात, "टाऊन प्लॅनिंगमध्ये इंजिनिअरला महत्व पण आर्किटेक्टला नाही. सर्किटमधील बाथरुम पाहिलं की किती मोठी बाथरुम आहेत. एकदा बीडला गेलो होतो तिथेही असाच प्रकार होता.

आपल्याकडे सौंदर्यदृष्टीचा अभाव, राज्यकर्त्यांचे लक्ष नाही. आपल्याकडे रस्ते बांधले जातात पण कोणत्या प्रकारचे रस्ते बांधायला हवेत याचा विचार नाही. आहेत पैसे म्हणून रस्ते बांधले जातात."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com