
Har Ghar Tiranga : बॉलीवूडच्या या कलाकारांची 'हर घर तिरंगा'ला साथ..
har ghar tiranga : यंदा भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Independence day 2022) देशात मोठ्या उत्साहात साजरा व्हावा या उद्देशाने येत्या 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान देशात आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यानुसार 'हर घर तिरंगा' ही मोहिम राबवण्यात येत आहे. काहींनी याला पाठिंबा दर्शवला आहे तर काही राजकीय नेत्यांनी आणि विचारवंतांनी याला कडाडून विरोध केला आहे. पण बॉलीवुड मात्र सर्व वाद बाजूला सारून दणक्यात स्वातंत्र्यदिन साजरा करत आहे. विशेष म्हणजे अनेक कलाकारांनी 'हर घर तिरंगा'ची साथ देत आपल्या घरांवर भारताचा राष्ट्राध्वज फडकवला आहे.
अभिनेते अनिल कपूर यांनी त्यांच्या बंगल्यावर तिरंगा ध्वज फडकावला आहे. याशिवाय त्यांनी तिरंग्यातील तीन रंगांची आकर्षक रोषणाई आपल्या बांगल्याभोवती केली आहे. त्यांनी आपल्या घरचा फोटो शेयर केला आहे.

anil kapoor home har ghar tiranga
अक्षय कुमार सध्या 'रक्षा बंधन' सिनेमामुळे चर्चेत आहे. त्याचा चित्रपट चालेल की नाही माहीत नाही पण अक्षय देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव मात्र जोरदारपणे साजरा करत आहे. एवढेच नाही तर तो प्रमोशन साठी जिथे जिथे जातो आहे, तिथेही तो 'हर घर तिरंगा' साठी आवाहन करत आहे. अक्षयने 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. अभिमानाने #HarGharTiranga उपक्रमात सहभागी व्हा,'असं ट्विट देखील केलं आहे.
'द कश्मीर फाइल्स' या बहुचर्चित सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी ट्विटवर तिरंगा ध्वज फडकावल्याचा व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ते कायमच आपल्या देशविषयी अभिमानाने बोलत असतात. शिवाय केंद्रसरकारच्या निर्णयाला त्यांचा पाठिंबाही असतो. त्यामुळे या मोहिमेतही हे सक्रिय आहेत.
आपल्या दर्जेदार अभिनयाने बॉलीवुड मध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या राजकुमार राव यानेही 'हर घर तिरंगा'चे समर्थन केले आहे. 'विजय विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा' असं म्हणत राजकुमार रावने तिरंग्या सोबतचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

बॉलीवुड अभिनेता आमिर खानने देखील या अभियानाचं समर्थन करत त्याच्या राहत्या घरावर झेंडा फडकवलाय. आमिरची मुलगी ईरा खान आणि आमिर यांचा त्यांच्या बालकनीतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये आमिरच्या बाजूला भारतीय ध्वजही दिसतोय.