malaika arora
malaika arora

मलाईका अरोराने शेअर केला घरगुती स्क्रब, पाहा काय आहे मलाईकाचं ब्युटी सिक्रेट?

Published on

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री मलाईका अरोरा सोशल मिडियावर चांगलीच ऍक्टीव्ह असते. अनेकदा ती घरात जे काही बनवते ते तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते. मलाईकाच्या सौंदर्याचे अनेकजण वेडे आहेत. तिच्या ब्युटी टिप्स देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. असंच एक ब्युटी सिक्रेट मलाईकाने नुकतंच एक व्हिडिओ बनवून शेअर केलं आहे.

मलाईका अरोरा घरगुती ब्युटी टीप्स अनेकदा चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून आली आहे. नुकताच असाच एक व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमधून ती तिचं ब्युटी सिक्रेट शेअर करत आहे. मलाईकाच्या या घरगुती ब्युटी टीप्स चाहत्यांच्या चांगल्याच पसंती पडतात. मलाईकाने अशी ब्युटी टीप शेअर केली आहे जी कोणीही घरात पटकन बनवू शकतं.

तिने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलंय, कोण म्हणतं कॉफी आरोग्यासाठी हानिकारक आहे? इथे या टीपमधून तुम्ही तुमच्या या शत्रुला हिरोमध्ये बदलू शकता. मलाईकाने याचा उपयोग सांगताना म्हटलंय, बॉडी स्क्रब- घरात उरलेली थोडी कॉफी, बाऊन शुगर आणि खोबरेल तेल. जर तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसेल तर पांढरी साखर देखील चालेल तसंच खोबरेल तेल, बादाम तेल यापैकी जे उपलब्ध असेल ते तुम्ही वापरु शकता. हे तुम्ही चेह-यावर हळूहळू लावा, हा पटकन होणारा आणि सुगंधित घरगुती स्क्रब आहे. कॉफीमध्ये असलेल्या कॅफीनमध्ये ऍंटीऑक्सीडंट असतात जे त्वचेला सूर्याच्या प्रखर प्रकाशापासून वाचवण्यास मदत करतात. यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. 

याआधी मलाईकाने कोरफडीचे उपयोग सांगितले होते. तिने सांगितलं होतं ती स्वतः त्वचेसाठी कोरफडीचा उपयोग करते. मलाईकाच्या ब्युटी टीप्स चाहत्यांमध्ये चांगल्याच प्रसिद्ध आहेत त्यामुळे तिचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.   

malaika arora shares beauty tips with home remedies  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com