'इंडियन आयडॉल'च्या परिक्षकांना मिळतं तब्बल इतकं मानधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Idol

'इंडियन आयडॉल'च्या परिक्षकांना मिळतं तब्बल इतकं मानधन

गायन आणि नृत्याचे अनेक शो प्रेक्षक पाहतात. पण गेली कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मन जिंकणारा शो म्हणजे 'इंडियन आयडॉल' Indian Idol. या शोमधील स्पर्धकांचा सुरेल आवाज प्रेक्षकांच्या नेहमीच पसंतीस पडतो. इंडियन आयडॉलचा सध्या बारावा सीझन सुरू आहे. या सीझनमध्ये नेहा कक्कर Neha Kakkar, हिमेश रेशमिया Himesh Reshammiya आणि विशाल दादलानी Vishal Dadlani हे परीक्षक आहेत. तर प्रसिद्ध गायक आदित्य नारायण Aditya Narayan या शोचं सूत्रसंचालन करतोय. अनेकांना प्रश्न पडत असेल की हे परीक्षक आणि सूत्रसंचालक या शोच्या एका एपिसोडसाठी किती मानधन घेत असतील? तर जाणून घेऊयात या शोसाठी हे परीक्षक किती मानधन घेतात. (indian idol 12 neha kakkar vishal dadlani himesh reshammiya charge millions for per episode)

प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर या शोमधील सर्वात जास्त मानधन घेणारी परीक्षक आहे. नेहा या शोच्या एका एपिसोडसाठी तब्बल पाच लाख रूपये मानधन घेते. गायक आणि संगीतकार विशाल दादलानी याला नेहापेक्षा कमी मानधन मिळतं. विशाल दादलानी शोच्या एका एपिसोडसाठी साडेचार लाख रूपये मानधन घेतो. बॉलिवूड चित्रपटांमधील हिट गाणी गायलेला हिमेश रेशमिया इंडियन आयडॉलच्या एका एपिसोडसाठी चार लाख रूपये मानधन घेतो. या शोचे विनोदी आणि हटक्या स्टाईलने सूत्रसंचालन करणारा गायक आदित्य नारायण या शोच्या एका एपिसोडसाठी अडीच लाख रूपये मानधन घेतो.

हेही वाचा : मनाला रिफ्रेश करण्यासाठी पाहा 'या' हलक्या-फुलक्या वेब सीरिज

या शोमध्ये गायक, संगीतकार आणि बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकार प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावतात. संगीतकार ए. आर. रेहमान, रेखा, नीतू कपूर, हेमा मालिनी, जया प्रदा, धर्मेंद्र, आनंदजी, जितेंद्र, एकता कपूर यांनी या शोमध्ये हजेरी लावली.

Web Title: Indian Idol 12 Neha Kakkar Vishal Dadlani Himesh Reshammiya Charge Millions For Per

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Entertainment