esakal | Indian Idol 12: आशिष कुलकर्णी बाहेर, शण्मुखप्रिया पुन्हा ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

indian idol

Indian Idol 12: आशिष कुलकर्णी बाहेर, शण्मुखप्रिया पुन्हा ट्रोल

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - भारतीय मनोरंजन क्षेत्रात गेल्या बारा वर्षांपासून आपली लोकप्रियता कायम ठेवणारा इंडियन आयडॉल (indian idol) हा शो सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे त्या शो मधील स्पर्धक स्पर्धेतून बाहेर पडणे. आतापर्यत प्रेक्षकांची ज्या स्पर्धकांना सर्वात जास्त पसंती होती त्या स्पर्धकांनाच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्यानं प्रेक्षक नाराज झाले आहे. आता आशिष कुलकर्णी (ashish kulkarni) हा स्पर्धेबाहेर पडला आहे. दुसरीकडे शण्मुख प्रिया (shanmukh priya) पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. ( indian idol 12 netizens makers as ashish kulkarni eliminated shanmukhapriya trolled again)

बॉलीवूडमधील लोकप्रिय गायिका आशा भोसले या काल इंडियन आयडॉलमध्ये आल्या होत्या. त्यावेळी स्पर्धकांनी त्यांची गाणी गायली. त्यानंतर एलिमिनेट होणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर करण्यात आले. त्यात आशिष कुलकर्णीचे नाव होते. तो यापुढे या स्पर्धेचा भाग असणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनु मलिक यांनी अरुणिता कांजीलालला सर्वाधिक मतं मिळाल्याचे सांगितले. यानंतर मलिक यांनी आशिष कुलकर्णी यांचे नाव जाहीर केले आणि मंचावर शांतता पसरली.

दुसऱ्या स्पर्धकाच्या तुलनेत कमी मतं मिळाल्यानं आशिष कुलकर्णीला स्पर्धेबाहेर व्हावं लागलं. आता स्पर्धेमध्ये मोहम्मद दानिश, शण्मुख प्रिया, पवनदीप, अरुणिता, सयाली आणि निहाल हे स्पर्धक राहिले आहेत. दुसरीकडे आशिषचे चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याचे स्पर्धेबाहेर पडणे चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. यापूर्वी अंजली गायकवाडच्या वेळी देखील चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

हेही वाचा: 'तू तिथे मी'; सुबोध भावेच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

हेही वाचा: अर्जुनने सांगितली शाळेतील कटू आठवण; 'नव्या आईवरुन चिडवायचे मित्र'

दुसरीकडे प्रेक्षकांनी शण्मुख प्रियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शो मधील परिक्षकांना बायस असल्याची टीका करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यापासून शण्मुख प्रिया ट्रोल होत असल्याचे दिसुन आले आहे. तिच्या गायकीला चाहत्यांनी नावं ठेवली आहेत. तिच्यावर टीकाही केली आहे.

loading image